हैदराबाद - तेलंगणा पोलिसांनी हरवलेल्या तब्बल 3 हजार 600 मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत सोपवले आहे. ऑपरेशन स्माईल अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई करत हरवलेल्या मुलांचा शोध लावला. पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हरवलेल्या मुलांचा शोध लागावा यासाठी तेलंगणा पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्यांनी या मोहिमेचे नाव 'ऑपरेशन स्माईल' असे ठेवले. 1 जानेवरी 2020 ते 31 जानेवरी 2020 पर्यंत राज्यात ऑपरेशन स्माईल राबवण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत 2 हजार 923 मुले तर 677 मुलांचा शोध लावला. पालकांपासून दुरावलेल्या एकूण 3 हजार 600 मुलांची त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणली. पोलीस महानिरीक्षक स्वाती यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - कोरोना व्हायरस : ३२३ भारतीयांसह मालदिवच्या 7 नागरिकांना घेऊन विमान दिल्लीत दाखल