ETV Bharat / bharat

केरळने कोरोनाला रोखले? दिवसभरात फक्त एकच पॉझिटिव्ह - कोरोना बातमी

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडूसह इतर राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केरळमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 17, 2020, 7:32 PM IST

तिरुअनंतपूरम - केरळ राज्यामध्ये आज (शुक्रवार) दिवसभरात फक्त एक कोरना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, तर दिवसभरात 10 जण बरे झाले आहेत. राज्यामध्ये आता 138 कोरोना अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 255 जण पूर्णत: बरे झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडूसह इतर राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केरळमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याने अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 1 हजार 766 जणांचा मृत्यू झाला असून 452 जण दगावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.