ETV Bharat / bharat

फक्त ऑनलाईन क्लासेस पुरेस नाहीत, शिक्षण क्षेत्रात पायाभूत बदल हवेत, इन्फोसिस अध्यक्ष

कोरोनामुळे अचानक ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, झूम अॅप क्लास, मोबाईलवरून ऑनलाईन क्लास सुरू झाले, मात्र, हे सर्व अल्पकालीन आणि तात्पुरती व्यवस्था आहे. पुढील काही वर्ष अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला शाळां कशा असाव्यात याचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे.

नंदन निलकेणी
नंदन निलकेणी
author img

By

Published : Jun 6, 2020, 7:40 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणुच्या फैलावामुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. अशा काळात ऑनलाईन शिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वळले आहे. मात्र, ही फक्त तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना असून आपण शाळांचा मुलभूतपणे विचार करून कणखर शिक्षण व्यवस्था उभारायला हवी, ज्यामुळे कठीण काळातही शिक्षण देणे सुरुच राहील, असे मत इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन निलकेणी यांनी व्यक्त केले.

शाळेचा वर्ग फक्त एकाच ठिकाणावर नसावा, शिक्षक हा एकटाच शिक्षण देणार नसावा आणि पुस्तक हेच फक्त शिक्षण घेण्याचे माध्यम नसावे. कठीण परिस्थितीतही शिक्षण सुरू राहील, अशी शिक्षण व्यवस्था उभारायला हवी, असे निलकेणी' फ्युचर ऑफ द स्कूल: ओव्हरकमींग कोव्हीड19 चँलेंजेस अॅन्ड बियॉन्ड' या ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत म्हणाले.

कोरोना लॉकडाऊनमुळे अचानक ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, झूम अ‌ॅप क्लास, मोबाईलवरून ऑनलाईन क्लास सुरु झाले, मात्र, हे सर्व अल्पकालीन आणि तात्पुरती व्यवस्था आहे. पुढील काही वर्ष अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला शाळा कशा असाव्यात याचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. नंदननिलकेणी एकस्टेप फाऊंडेशेनचेही सहसंस्थापक आहे. यांसघटनेद्वारे भारतातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

कणखर शिक्षणव्यवस्था म्हणजे काही अडचण आली तरी शिक्षण सुरु राहीले पाहीजे. जसे की, खवळलेल्या समुद्रात जहाज चालते. तशी शिक्षण व्यवस्था हवी. आपत्तीचा सामना करण्याची आपली पारंपरिक व्यवस्था आता अपंग झाली आहे. कोरोना साथीच्या आजाराचे परिणाम अनेक वर्ष आपल्याला भोगावे लागण्याची शक्यता आहे. वादळ, भुकंप यासारख्या आपत्ती ठरावीक काळात येतात आणि त्यातून लगेच बाहेर पडता येते, मात्र, कोरोना बरोबर आपल्याला आणखी किती वर्ष रहावे लागू शकते, सांगू शकत नाही. त्यामुळे पांरपारिक शाळा बदलून त्यांच्यात पायाभूत बदलांची गरज असल्याचे निलकेणी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.