नवी दिल्ली - कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. कांद्याला डॅालरपेक्षा जास्त भाव आला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रीत झाले आहे. वाढत्या भावामुळे कांदा हॉटेलमधून गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे हॉटेल मालकांनी 'कांद्याऐवजी मुळा घ्या, कांदा मागून आम्हाला लाजवू नका', अशी विनंती करणार पोस्टर हॉटेलमध्ये लावले आहे.
'कांदा मागून आम्हाला लाजवू नका', मालकाने लावले हॉटेलमध्ये पोस्टर - Posters Requesting Customers To Not Ask For Onions
वाढत्या भावामुळे कांदा हॉटेलमधून गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे हॉटेल मालकांनी कांद्याऐवजी मुळा घ्या,अशी विनंती करणार पोस्टर हॉटेलमध्ये लावले आहेत.
नवी दिल्ली - कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. कांद्याला डॅालरपेक्षा जास्त भाव आला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रीत झाले आहे. वाढत्या भावामुळे कांदा हॉटेलमधून गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे हॉटेल मालकांनी 'कांद्याऐवजी मुळा घ्या, कांदा मागून आम्हाला लाजवू नका', अशी विनंती करणार पोस्टर हॉटेलमध्ये लावले आहे.
'कांदा मागून आम्हाला लाजवू नका', मालकाने लावले हॉटेलमध्ये पोस्टर
नवी दिल्ली - कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. कांद्याला डॅालरपेक्षा जास्त भाव आला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रीत झाले आहे. वाढत्या भावामुळे कांदा हॉटेलमधून गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील वारणसी येथे हॉटेल मालकांनी कांद्याऐवजी मुळा घ्या, कांदा मागून आम्हाला लाजवू नका, अशी विनंती करणार पोस्टर हॉटेलमध्ये लावले आहेत.
कांद्याच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. वाराणसीमधील हॉटेलमध्ये डाळींब आणि सफरचंदपेक्षा कांदा महाग अश्या आशयाचे पोस्टर लावले आहे. तर कांदा मागून आम्हाला लाजवू नका, कांद्याऐवजी मुळा घ्या, असेही एक पोस्टर लावले आहे.
कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर व्यावसायिकांनी देखील देखील कांद्याचे दर प्रचंड वाढल्याने कांदाभजी विकणे बंद केले आहे. कांद्याने घरचे आणि व्यवसायाचे बजेट बिघडले आहे. लवकर दर कमी व्हावा असे आम्हाला वाटत, असल्याच्या प्रतिक्रिया छोटे हॉटेल व्यावसायिक देत आहेत.
सलग दुसऱ्या आठवड्यात कांद्याचे दर किरकोळ बाजारपेठेत प्रति किलो १०० रुपयांहून अधिक आहेत. या किमती आटोक्यात राहण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणखी १२ हजार ६६० टन कांदा आयात करणार आहे. हा कांदा देशात २७ डिसेंबरला पोहोचणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.