नवी दिल्ली - देशाच्या इतिहासामध्ये 25 जून हा दिवस वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चिला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती. यावेळी आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना सरकारने कैद केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला आहे.
शाह म्हणाले “45 वर्षांपूर्वी सत्तेसाठी एका कुटुंबाने देशावर आणीबाणी लादली. एका रात्रीत देशाला कारागृहमध्ये बदलून टाकले. पत्रकार परिषद, न्यायालय, व्याख्याने सर्व प्रकारच्या गोष्टी थांबल्या. गरिब आणि दलितांवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर लाखो लोकांच्या प्रयत्नांमुळे ही आणीबाणी उठवण्यात आली. देशाला पुन्हा लोकशाही मिळाली. काँग्रेसने लावलेली आणीबाणी केवळ एका परिवाराच्या फायद्यासाठी होती. आजही काँग्रेस तसेच वागत आहे.” असे गृहमंत्री म्हणाले.