ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एक ठार, तर १७ जखमी.. - जल्लीकट्टू स्पर्धा एक ठार

पुडुक्कोट्टाई गावातील रहिवासी असलेले सुभाष चंद्र बोस (२४) यांचा या स्पर्धेदरम्यान मृत्यू झाला. या स्पर्धेमध्ये साधारणपणे एक हजार बैल, आणि ८२० प्रशिक्षकांनी सहभाग दर्शवला होता. तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री एस. पी. वेलुमणी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले होते.

One dead, 17 injured in jallikattu in Tamil Nadu
तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एक ठार तर १७ जखमी..
author img

By

Published : Feb 23, 2020, 10:47 PM IST

चेन्नई - तामिळानाडूच्या कोईम्बतूरमध्ये आज (रविवार) आयोजित करण्यात आलेल्या जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. तर यावेळी १७ लोक जखमी झाले. यातील एकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

पुडुक्कोट्टाई गावातील रहिवासी असलेले सुभाष चंद्र बोस (२४) यांचा या स्पर्धेदरम्यान मृत्यू झाला. बैलाचे शिंग छातीत घुसून झालेल्या जखमेमुळे ते जागीच ठार झाले. तर, मदुराईमधील मुरूगन (37) या व्यक्तीलाही दुसऱ्या एका बैलाचे शिंग घशामध्ये लागून गंभीर इजा झाली आहे.

या स्पर्धेमध्ये साधारणपणे एक हजार बैल, आणि ८२० प्रशिक्षकांनी सहभाग दर्शवला होता. तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री एस. पी. वेलुमणी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले होते. कोईंबतूर जिल्हा प्रशासन, आणि कोईंबतूर जल्लीकट्टू असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तेलंगाणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासूदेव हेदेखील या स्पर्धेला उपस्थित होते. ते म्हणाले, की या पारंपारिक खेळाला पुढे नेणे आवश्यक आहे. तसेच, याचे आयोजन करणाऱ्यांनी बैलांच्या आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मदुराई जिल्ह्यातील अजयला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले. २० बैलांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिल्यामुळे त्याला हा सन्मान मिळाला. त्याला बक्षीस म्हणून मारूती कंपनीची अल्टो चारचाकी, आणि जमीन मिळाली आहे.

हेही वाचा : चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.