ETV Bharat / bharat

कोरोनावरील लस राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देणार; तामिळनाडू सरकारचा निर्णय - तामिळनाडू मुख्यमंत्री पलानीस्वामी बातमी

पुद्दुकोट्टाई जिल्ह्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ही घोषणा केली. कोरोनावर लस तयार झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, असे ते म्हणाले.

CM Palaniswami
मुख्यमंत्री पलानिस्वामी
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:11 PM IST

चेन्नई - कोरोना विषाणू विरोधातील लस तयार झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही बिहारमध्ये सत्तेत आल्यावर सर्वांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता तामिळनाडू राज्याने लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.

पुद्दुकोट्टाई जिल्ह्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ही घोषणा केली. कोरोनावर लस तयार झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, असे ते म्हणाले.

बिहार विधानसभेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने लसीला मान्यता दिल्यानंतर बिहारमधील जनतेला मोफत लस मिळेल, असे त्यांनी म्हटले.

देशात कोरोनाचा प्रसार अद्यापही होत आहे. मात्र, आता नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली आली आहे. देशात सध्या ७ लाखांपेक्षा जास्त कोविड अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एक लाख १६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनावर लस बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अद्याप लस तयार झालेली नाही. विविध देशांच्या लसीची चाचणी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.