जागतीक तापमानवाढीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणचे संतुलन ढासळत चालले आहे. जागतीक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वार्मिंगचा सर्वाधिक फटका हा समुद्री प्रवाळाच्या परिसंस्थांना बसत असल्याचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या एका अहवालातून समोर आले आहे. प्रामुख्याने भारतीय आणि अटलांटिक महासागरात असलेल्या प्रवाळाच्या परिसंस्था निसर्गातील या बदलांमुळे झपाट्याने नष्ट होत असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. प्रवाळ परिसंस्था नष्ट झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या इतर परिसंस्थांना देखील त्याचा फटका बसेल, असा इशाराही या अहवालामधून देण्यात आला आहे.
या अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, निर्सगामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या प्रवाळाच्या परिसंस्था या वाढत्या प्रदूषणामुळे झपाट्याने नष्ट होत आहे. त्यांचा नष्ट होण्याचा वेग हा अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जागतीक तापमान वाढ हा घटक या प्रवाळ परिसंस्था नष्ट करण्यास सर्वाधिक कारणीभूत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्यातील प्रवाळांच्या परिसंस्था प्रभावित होत असून, त्यांच्यामध्ये जनुकीय बदल होत आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे त्यांचे पोषण होऊ शकत नाही. पोषण न झाल्याने मुळात रंगीबेरंगी असलेली ही प्रवाळे पाढंरी पडतात व कालंतराने नष्ट होतात. यालाच प्रवाळ विरळण्याची प्रकिया असे देखील म्हणतात. यामुळे अन्य समुद्रीय परिसंस्था देखील धोक्यात आल्या आहेत.
हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या
औद्योगीक क्रांतीमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. मोठमोठ्या कारख्यान्यांची निर्मिती झाली. वस्तू उत्पादनाचा वेग वाढला. कामाचे सुलभीकरण झाले. मात्र त्याचबरोबर समस्या देखील वाढल्या, कारखान्यातून निर्माण होणार कार्बनडायऑक्साइड हा हवेत सोडला जात असल्याने वायु प्रदुषणात भर पडली. त्याचा परिणाम ओझनच्या थरावर झाल्याने दिवसेंदिवस ओझनचा थर हा पातळ होत आहे. ओझनचा थर कमी होत असल्याने सुर्याची अतिनिल किरणे थेट पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे जागतीक तापमान वाढीची समस्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम पृथ्वीवर असलेल्या विविध परिसंस्थांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. औद्योगीक क्रांतीसोबतच जगात कृषी क्रांती देखील झाली. अन्नधान्याच्या अधिक उत्पादनासाठी शेतकरी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस तंत्रज्ञानाकडे ओळले आहेत. पॉली हाऊसमधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन मोनो ऑक्साइड बाहेर पडत असून, हे देखील ग्लोबल वार्मिंग वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. तसेच घरात वापरण्यात येणारी आधुनिक उपकरणे फ्रीज, एसी यामुळे देखील ग्लोबल वार्मिंगमध्ये भर पडत आहे. तसेच वाहनांचा वापर वाढल्याने देखील मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषणात भर पडत आहेत.
शतकाच्या शेवटी तापमानात 2 अशं सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा
कार्बन मोनो ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण असेच राहिल्यास या शतकाच्या शेवटी जागतिक तापमानात 2 अशं सेल्सिअसने वाढ होण्याचा धोका या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याचा परिणाम प्रवाळ परिसंस्थेसोबतच इतर परिसंस्थांवर देखील होणार आहे. मानवाला आपली चूक लक्षात आली असून, 2014 पासून ग्लोबल वार्मिंग कमी कसे करता येईल, त्यावरील उपाययोजना काय असतील यावर संशोधन सुरू झाले आहे. मात्र याच संशोधनाला दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2004 साली सुरुवात व्हायला हवी होती, असे निरीक्षण या अहवालामध्ये नोंदवण्यात आले आहे.
हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना
हरितगृह वायुंच्या उत्सर्जनामुळे जागतीक तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. यावर वेळीच प्रतिबंध घालने आवश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यासाठी असणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुचवण्यात आल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कमी करणे, पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये पेट्रोल, डिझेल, कोसळा यासारख्या संसाधनाचा समावेश होतो. यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या संसाधनाच्या वापरावर भर देणे. शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकीच्या पर्याचा अवलंब करणे, त्यामुळे खासगी वाहनापासून होणाऱ्या प्रदुषणाला आळा बसेल. असे अनेक उपाय यामध्ये सुचवण्यात आले आहेत.
....तर 2045 पर्यंत जगातील आर्धी प्रवाळ बेटे होऊ शकतात नष्ट
समुद्रातील वाढत्या तापमानामुळे प्रवाळ परिसंस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्रात यांत्रिक पद्धतीने होणारी मासेमारी, कारखान्याती पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणे, यासरख्या अन्य कारणांमुळे देखील मोठ्या प्रमाणात ही प्रवाळ बेटे नष्ट होत आहेत. जर हे प्रमाण असेल राहिले तर 2045 पर्यंत जगातील अर्धी प्रवाळ बेटे नष्ट होतील असा इशारा देखील या अहवालामधून देण्यात आला आहे. असे झाल्यास आपण एका मोठ्या परिसंस्थेला गमावून बसू, यामुळे समुद्रातील इतर परिसंस्था देखील धोक्यात येतील.