नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व जनजीवन जवळपास ठप्प आहे. अशात कठीण प्रसंगात, नजफगड परिसरातील १२ अंध विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा द्वारका जिल्हा पोलिसांनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
नजफगड परिसरातील अंध विद्यार्थ्यांना, खाण्यासाठी काही साधन सामुग्री उपलब्ध नसल्याची माहिती पोलिसांना एका ट्विटच्या माध्यमातून मिळाली. तेव्हा पोलिसांनी १ महिन्याचे राशन त्या विद्यार्थांना दिले. यात ५० किलो तांदूळ, ५० किलो पीठ-दाळ, साखर, मीठ, भाजी, तेल आणि साबणांचा समावेश आहे.
नवज्योती दृष्टीहीन सेवा संघाच्या सदस्यांनी १२ अंध विद्यार्थांना खाण्यासाठी काही नसल्याचे ट्विट केले. हे ट्विट सोशल मीडियावर नजर ठेऊन असलेल्या पोलिसांनी पाहिले आणि त्यांनी या ट्विटची दखल घेतली. हेडकॉस्टेबल मनिष यांनी त्यांच्या टीमसह तिथे जाऊन त्या विद्यार्थांना राशन दिले.
हेही वाचा - क्वारंटाईनमधून कुटुंबीयांना फोन करू नका, तेही क्वारंटाईन होतील' वादग्रस्त ट्विटमुळे पत्रकाराला अटक
हेही वाचा -वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोबोटची मदत