श्रीनगर (जम्मू आणी काश्मीर) - नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्या सुटकेची मागणी केली आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून, राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी ओमर अब्दुल्ला यांची मागील महिन्यात सूटका करण्यात आली. मात्र, मुफ्ती आणि इतर पक्षांच्या नेत्यांना अजूनही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
-
. @MehboobaMufti must be set free. Shifting her home while continuing to keep her detained is a cop out.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">. @MehboobaMufti must be set free. Shifting her home while continuing to keep her detained is a cop out.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 7, 2020. @MehboobaMufti must be set free. Shifting her home while continuing to keep her detained is a cop out.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 7, 2020
जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झालेली त्यांची नजरकैद अद्याप संपलेली नाही. आता फक्त त्यांची रवानगी त्यांच्या श्रीनगर येथील घरी करण्यात आली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून, मुफ्ती यांना घरी नजरकैदेत न ठेवता पोलीस बंदोबस्त हटवून त्यांची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. तसेच जेकेपीसी पक्षाचे प्रवक्ते जुनेद अझीम यांनीही ट्वीट करून मेहबुबा मुफ्ती आणि जेकेपीसीचे अध्यक्ष सजाद लोण यांच्या सुटकेची मागणी केली आहे.