श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यामंत्री ओमर अब्दुल्ला यांना मंगळवारी मुक्त करण्यात आले. साधारणपणे आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.
गेल्यावर्षी ५ ऑगस्टला त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारीला नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना कैद करण्यात आले होते. १० मार्चला ते ५० वर्षांचे झाले. आतापर्यंत साधारणपणे २३२ दिवस ते कैदेत होते.