ETV Bharat / bharat

आमचे सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्लीत बैठका, नेपाळच्या पंतप्रधानांचा आरोप - oli on India

नेपाळने नुकतेच भारतीय हद्दीतील लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे रणनितीकदृष्या मह्त्त्वाच्या भूप्रदेशावर आपला दावा सांगितला आहे. हे भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरु झाला आहे.

के. पी ओली
के. पी ओली
author img

By

Published : Jun 28, 2020, 8:17 PM IST

काठमांडू - भारत नेपाळमध्ये सीमावाद सुरु झाला असताना नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. नेपाळमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दिल्लीत बैठका झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान ओली यांनी केले आहे. नेपाळने नुकतेच भारताच्या हद्दीतील महत्त्वाचे भूभाग स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले असून यासंबधीचा कायदाही पास केला आहे.

नेपाळमधील सरकार बहुमतात असून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पंतप्रधान आली यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या सभेत सांगितले. नेपाळने राज्यघटना दुरुस्त केल्यामुळे दिल्लीत बैठका होत आहेत, अशी बातमी मिळत आहे. भारत नेपाळ सरकार उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला. नेपाळचे पंतप्रधान ओली आणि एनसीपी कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्तही येत आहे.

भारत नेपाळ सीमावाद

नेपाळने नुकतेच भारतीय हद्दीतील लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे रणनितीकदृष्या मह्त्त्वाच्या भूप्रदेशावर आपला दावा सांगितला आहे. हे भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबध बिघडले आहेत. कृत्रिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा प्रयत्न भारत कधीही मान्य करणार नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सीमेवर भारताने बांधलेला रस्ताही नेपाळच्या हद्दीत असल्याचा आरोप नेपाळने केला आहे. मात्र, हे तीन्ही भूप्रदेश पुर्वावार भारताचे असून यांचा अनेक सामंजस्य करारात सामवेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.