ETV Bharat / bharat

नेपाळच्या पंतप्रधानांकडून मोदींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

author img

By

Published : Aug 15, 2020, 5:00 PM IST

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 74 व्या स्वातंत्र्यता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

edited photo
edited photo

काठमांडू - भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनादिवशी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दोघांनी कोरोनाबाबात चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी भारताच्या विकास व समृद्धीसाठीही शुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांनी ट्वीट करत, 74 व्या स्वातंत्र्यता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार व भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीयांच्या विकास व समृद्धीसाठी शुभेच्छा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नेपाळने त्यांचा सुधारित नकाशा जाहीर केला होता. त्यामध्ये भारताचा काही भाग नेपाळमध्ये दर्शविला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाही नेपाळच्या पंतप्रधानांचे फोन करून शुभेच्छा देणे म्हणजे दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची चिन्हे असल्याचे मानले जात आहे.

नेपाळने मे महिन्यात कलानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भारतीय प्रदेशांचा समावेश स्वतःच्या सुधारित नकाशामध्ये केला होता. नेपाळने यासाठी ऐतिहासिक पुरावे असल्याचा दावा केला होता. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.

भारत देशाकडून नेपाळला त्यांच्या देशातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी विविध प्रकल्पांतर्गत निधी दिला जातो. 2003 पासून भारताने 422 सामुदायिक विकास प्रकल्प नेपाळमध्ये राबवले आहेत. नेपाळमधील 77 जिल्ह्यांमधील विकासकामांसाठी भारताने 798.7 कोटींची मदत केल्याची माहिती काठमांडू येथील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.