ETV Bharat / bharat

कोरोना नष्ट करण्यासाठी दिला नरबळी; म्हणाला देवीने स्वप्नात येऊन सांगितला होता उपाय

author img

By

Published : May 28, 2020, 7:58 PM IST

कोरोना महामारीचे संकट नष्ट व्हावे यासाठी हा बळी दिल्याची कबूली ओझा याने दिली आहे. आपल्याला देवीने स्वप्नात येऊन कोरोना नष्ट करण्यासाठी नरबळी देण्याची आज्ञा दिल्याचेही त्याने म्हटले आहे.

Septuagenarian priest kills man to 'end' COVID-19 pandemic
कोरोना नष्ट करण्यासाठी दिला नरबळी; म्हणाला देवीने स्वप्नात येऊन सांगितला होता उपाय..

भुवनेश्वर - ओडिशाच्या कटक जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील नरसिंहपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा नरबळी देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला अटक केली आहे.

कटक जिल्ह्यातील बंधहुडा या गावामध्ये असलेल्या मंदिरात संसारी ओझा (७३) या मांत्रिकाने सरोज प्रधान (५०) या व्यक्तीचा बळी दिला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. कोरोना महामारीचे संकट नष्ट व्हावे यासाठी हा बळी दिल्याची कबूली ओझा याने दिली आहे. आपल्याला देवीने स्वप्नात येऊन कोरोना नष्ट करण्यासाठी नरबळी देण्याची आज्ञा दिल्याचेही त्याने म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळी देण्यावरून ओझा आणि प्रधान यांच्यामध्ये मंदिरात वाद झाला होता. यातच रागाच्या भरात ओझाने प्रधान याचे शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर ओझा याने स्वतः च पोलीस स्थानकावर येऊन आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि प्रधान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याठिकाणाहून खुनाचे हत्यारही जप्त केले आहे.

दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ओझा आणि प्रधान यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वैर होते. त्यामुळे ओझाने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : जन्मठेपेची शिक्षा घेत असलेल्या कैद्याची चेन्नईमध्ये नैराश्यातून आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.