तितलागड - ओडिसा सरकारमधील मंत्री टुकुनी साहू यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साहू या दिव्यांग शाळकरी मुलांना बुट आणि सॉक्स घालताना दिसत आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
टुकुनी साहु या नवीन पटणायक सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आणि मिशन शक्ती विभागाच्या मंत्री आहेत. साहु यांनी दिव्यांग मुलांच्या वसतिगृहातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिव्यांग मुलांना दिले. साहू या नवीन पटनायक सरकारमधील मंत्री आहेत. त्यांनी दिव्यांग मुलांविषयी दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.