भुवनेश्वर - ओडिशामध्ये यावर्षी 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यातील विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 1 हजार 54 क्विंटलपेक्षा अधिक गांजा सापडला. हा एक विक्रम आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अभय यांनी मंगळवारी दिली.
सर्वांत जास्त गांजा अनुक्रमे कोरापुट (413 क्विंटल), मलकनगिरी (240 क्विंटल) व गाजापटी (126 क्विंटल) येथून जप्त करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांत सरासरी 312 क्विंटल आणि गेल्या पाच वर्षांत सरासरी 414 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला, असे ते म्हणाले.
'अशा अंमली पदार्थांच्या तस्करीमागे संघटित टोळी आणि मोठे अर्थकारण असण्याची शक्यता आहे. यासाठी ओडिशा पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. ओडिशातील अंमली पदार्थांचा व्यापार संपवण्यास पोलिस कटिबद्ध आहेत,' असे डीजीपी अभय म्हणाले.
हेही वाचा - सिमला : सुमारे दोन किलो चरससह एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात