ETV Bharat / bharat

#CAA Protest LIVE : उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनामध्ये 6 जणांचा मृत्यू - सीएए विरोधी आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.

#CAA Protest Live Updates
#CAA Protest LIVE : मध्यप्रदेशमध्येही कलम १४४ लागू
author img

By

Published : Dec 20, 2019, 9:23 AM IST

Updated : Dec 21, 2019, 12:00 AM IST

  • गुजरात सरकारने राजकोटमध्ये १ जानेवारी, २०२० पर्यंत कलम १४४ लागू केले आहे.
  • मध्य प्रदेशमधील 52 जिल्ह्यांपैकी 50 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. जबलपूरमध्ये उद्या 21 डिंसेबर म्हणजेचच सायंकाळी 6 वाजे पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
  • उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनामध्ये 6 जणांचा मृत्यू
  • कानपूरमध्ये आंदोलनात गोळीबार झाला असून 8 लोकांना गोळी लागली आहे.
  • मेरठमध्ये आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू
  • दिल्ली गेटजवळ आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
  • आज सायंकाळी सीमपूर उड्डाणपूल आणि लोहा पूलच्या आसपासच्या भागात मोठ्या संख्येने निदर्शक जमा झाले होते. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती डीसीपी व्ही.पी. सूर्य यांनी दिली.

3.06 PM : बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही, असे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी स्पष्ट केले आहे..

2.55 PM : दिल्ली पोलिसांकडून चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्याचा प्रयत्न, मात्र त्यांच्या समर्थकांनी वेळीच त्यांना बाहेर नेले..

2.40 PM : भाजपकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. संयुक्त राष्ट्र किंवा मानवाधिकार संस्थेने एखादी समिती नेमून, जनमत घ्यावे. - ममता बॅनर्जी (मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल)

1.44 PM : हैदराबादमध्ये चारमिनारजवळ निदर्शनाला सुरुवात..

1.27 PM : काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाला मंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे, यामध्ये वरिष्ठ नेते एम. बी. पाटील यांचाही समावेश आहे.

1.26 PM : दिल्लीतील जामा मस्जिद समोर आंदोलनाला सुरूवात झाली आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाददेखील याठिकाणी उपस्थित आहे.

12.37 PM : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या दिल्ली महिला काँग्रेस अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांना अटक..

12.13 PM : तामिळनाडू पोलिसांनी ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चेन्नईच्या वल्लुर कोट्टममध्ये आंदोलनासाठी आलेल्या अभिनेत सिद्धार्थ, संगीतकार टी. एम. कृष्णा, खासदार तिरूमावलवण आणि एम. एच. जवाहिरूल्ला यांचाही समावेश आहे. पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. तरीही याठिकाणी आंदोलन करण्यात आल्याने, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11.34 AM : दोन पत्रकारांना अटक केल्याचे वृत्त खोटे, ते केरळहून आले होते, त्यांना परत पाठवण्यात आले आहे - बसवराज बोम्मई (गृहमंत्री, कर्नाटक)

10.54 AM : ईशान्य दिल्लीमध्ये संचारबंदी, पोलीस 'ड्रोन'ने ठेवणार नजर; सोशल मीडियावरही ठेवणार लक्ष..

10.32 AM : नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा पहिल्यापासून विरोध, मात्र इतर पक्षांप्रमाणे हिंसक मार्गाने नाही - मायावती (अध्यक्षा, बसप)

10.23 AM : नागरिकत्व सुधारणा कायद्याचा ठामपणे, मात्र शांततेच्या मार्गाने आणि परवानगी घेऊन विरोध करणार - असदुद्दीन ओवैसी (अध्यक्ष, एआयएमआयएम)

10.12 AM : एआयएमआयएमच्या मुख्यालयात युनायटेड मुस्लीम अ‌ॅक्शन कमिटीची बैठक सुरू

10.10 AM : केरळच्या पत्रकाराला मंगळुरूमधील वेनलॉक जिल्हा रूग्णालयातून अटक करण्यात आली..

9.20 AM : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना जामा मस्जिद ते जंतरमंतर पर्यंतच्या मोर्चाची परवानगी दिल्ली पोलिसांनी नाकारली.

9.17 AM : आसाममधील इंटरनेट सेवा पूर्ववत, हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ डिसेंबरपासून करण्यात आली होती बंद..

6.30 AM : मध्यप्रदेशच्या ४४ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू..

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.

ही संचारबंदी धुडकावून लावत, मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झालेली पहायला मिळाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका व्यक्तीचा आणि कर्नाटकच्या मंगळुरू मधील दोघांचा जीव गेला. काल रात्री उशीरा मंगळुरूमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली, तसेच तिथली इंटरनेट सेवाही ४८ तासांसाठी बंद करण्यात आली.

Intro:Body:

#CAA Protest LIVE : मध्यप्रदेशच्या ४४ जिल्ह्यांमध्येही कलम १४४ लागू

6.30 AM : मध्यप्रदेशच्या ४४ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.

ही संचारबंदी धुडकावून लावत, मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झालेली पहायला मिळाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका व्यक्तीचा आणि कर्नाटकच्या मंगळुरू मधील दोघांचा जीव गेला. काल रात्री उशीरा मंगळुरूमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली, तसेच तिथली इंटरनेट सेवाही ४८ तासांसाठी बंद करण्यात आली.

Conclusion:
Last Updated : Dec 21, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.