नवी दिल्ली - आज जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा मोठा घातपाचा कट हाणून पाडला. यानंतर मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती दिली.
पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोसिव डिवाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. एका दुचाकीची नंबर प्लेट असलेल्या कारमध्ये सुमारे २० किलो आयईडी ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलाला याची वेळीच माहिती मिळाल्याने त्यांनी आयईडी निकामी करुन मोठा स्फोट टाळला.
कठुआमध्ये रजिस्टर्ड असलेल्या या गाडीचा कश्मीर पोलिसांनी माग काढला होता. केंद्रीय तपास पथकाकाडे याचा तपास देण्यात आला असून परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ ला आयईडीचा वापर करुन असाच हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.