ETV Bharat / bharat

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून बुद्धिभेद करणाऱ्यांवर कारवाई करा - नरेंद्र सावईकर - naredra sawaikar goa latest news

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून चुकीची माहिती देत समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. उलट हे विधेयक आणून केंद्रातील भाजप सरकारने ऐतिहासिक चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अभिनंदनास पात्र आहेत.

GOA
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून बुद्धिभेद करणाऱ्यांवर कारवाई करा - नरेंद्र सावईकर
author img

By

Published : Dec 17, 2019, 9:13 AM IST

पणजी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकांचा सर्वात मोठा लाभ हा धार्मिक अल्पसंख्याक घटकांना होणार आहे. असे असताना काँग्रेस आणि त्यांचे सहकारी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. या विधेयकावरून समाजामध्ये बुद्धिभेद करणाऱ्यां सर्वच घटकांवर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी गोव्याचे एनआरआय कमिशन तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी केली.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून बुद्धिभेद करणाऱ्यांवर कारवाई करा - नरेंद्र सावईकर
पणजीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सावईकर म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून चुकीची माहिती देत समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. उलट हे विधेयक आणून केंद्रातील भाजप सरकारने ऐतिहासिक चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्याचा मोठा लाभ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातून धार्मिक छळाला त्रासाला कंटाळून भारतामध्ये आश्रय घेतलेल्या धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला होणार आहे. त्यांना यामध्यमातून संरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे.

या विधेयकावर संसदेत चर्चा झाली आहे, असे सांगून सावईकर म्हणाले, काँग्रेस राज्य करताना केवळ मतपेटीचा विचार केला. तरीही यावरुन आता काँग्रेस आणि सहकारी समाजात गैरसमज पसरवित आहेत. याचा गोवा भाजप निषेध करत आहेत. तसेच समाजाचा बुद्धीभेद करणाऱ्यांवर केंद्राने करावाई करावी. केंद्र सरकार विकासाबरोबरच चुकाही दुरूस्त करत आहे. तसेच देशातील सौहार्द कायम रहावे याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याने लोकांनी मोदी सरकारच्या मागे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्याबरोबरच मूळ गोमंतकीय असलेले आणि सध्या विदेशात असलेल्या भारतीयांची माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळ आणि ईमेल यांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या संपर्कात आहे, असेही सावईकर यांनी सांगितले. यावेळी प्रदेश भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे उपस्थित होते.

Intro:पणजी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकांचा सर्वात मोठा लाभ हा धार्मिक अल्पसंख्याक घटकांना होणार आहे. असे असताना काँग्रेस आणि त्यांचे सहकारी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. या विधेयकावरून समाजामध्ये बुद्धिभेद करणाऱ्यां सर्वच घटकांवर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी गोव्याचे एनआरआय कमिशन तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी केली.

Body:पणजीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सावईकर म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून चुकीची माहिती देत समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. उलट हे विधेयक आणून केंद्रातील भाजप सरकारने ऐतिहासिक चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्याचा मोठा लाभ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातून धार्मिक छळाला त्रासाला कंटाळून भारतामध्ये आश्रय घेतलेल्या धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला होणार आहे. त्यांना यामध्यमातून संरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे.
या विधेयकावर संसदेत चर्चा झाली आहे, असे सांगून सावईकर म्हणाले, काँग्रेस राज्य करताना केवळ मतपेटीचा विचार केला. तरीही यावरुन आता कॉग्रेस आणि सहकारी समाजात गैरसमज पसरवित आहेत. याचा गोवा भाजप निषेध करत आहेत. तसेच समाजाचा बुद्धीभेद करणाऱ्यांवर केंद्राने करावाई करावी. केंद्र सरकार विकासाबरोबरच चुकाही दुरूस्त करत आहे. तसेच देशातील सौहार्द कायम रहावे याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याने लोकांनी मोदी सरकारच्या मागे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्याबरोबरच मूळ गोमंतकीय असलेले आणि सध्या विदेशात असलेल्या भारतीयांची माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळ आणि। ईमेल यांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या संपर्कात आहे, असेही सावईकर यांनी सांगितले.
या वेळी प्रदेश भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.