ETV Bharat / bharat

'पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होणार नाहीच' - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.

ममता बॅनर्जी
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:55 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर एनआरसी मुद्यावरून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.

  • WB CM Mamata Banerjee: Some people are instigating you in the name of National Register of Citizenship (NRC). Don't trust any leader from outside, trust us who fight from this land and stand beside you. NRC will not be implemented, keep this in mind. There is nothing to worry. pic.twitter.com/CbcefGNYc8

    — ANI (@ANI) November 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनआरसीच्या नावाखाली काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परक्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका. आमच्यावर विश्वास ठेवा, काळजी करण्यासारखी कोणतीच गोष्ट नसून मी बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा, असे ममता यांनी म्हटले आहे.

मात्र आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी एनआरसी देशभरात लागू होणार असून भारतीय असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे एनआरसी हेच असल्याचे ते म्हणाले.

सध्या आसाममध्ये एनआरसी यादीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. ३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या, आसाम राज्याच्या राष्ट्रीय नागरिकत्व यादीमधून साधारणपणे १.९ दशलक्ष लोक वगळले गेले होते. या वगळल्या गेलेल्या लोकांना आपण भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Intro:Body:

रपर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.