ETV Bharat / bharat

'आम्ही डबल शिफ्ट काम करत आहोत; अगदी झोपण्यासाठीही मिळत नाही वेळ'

author img

By

Published : Apr 30, 2020, 12:43 PM IST

लोक आम्हाला त्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवडून देतात. ते संकटात असताना आम्हाला झोप येणे कसे शक्य आहे? दिवसभर आम्ही या लोकांसाठी घराबाहेर पडून काम करतो. त्यानंतर रात्रीही आम्हाला व्हर्च्युअल पद्धतीने काम करतच राहतो, असे ममता बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना म्हटल्या.

Not getting any time to sleep, says Mamata
'आम्ही डबल शिफ्ट काम करत आहोत; अगदी झोपण्यासाठीही मिळत नाही वेळ'

कोलकाता - कोरोनाशी लढा देण्यासाठी जगभरातील 'कोरोना वॉरियर्स' हे दिवसरात्र मेहनत करत आहेत. यांमध्ये डॉक्टर आणि पोलीस अग्रस्थानी असले, तरी प्रशासन चालवणारे मंत्री आणि नेतेही यांच्यासोबतच कोरोनाशी सामना करत आहेत. आपापल्या देशांमध्ये-राज्यांमध्ये सुव्यवस्था रहावी यासाठी हे लोकप्रमुख अविरतपणे काम करत आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत बोलताना म्हटले, की लोक आम्हाला त्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवडून देतात. ते संकटात असताना आम्हाला झोप येणे कसे शक्य आहे? दिवसभर आम्ही या लोकांसाठी घराबाहेर पडून काम करतो. त्यानंतर रात्रीही आम्हाला व्हर्च्युअल पद्धतीने काम करतच राहतो. मंगळवारपासून मला डोकेदुखीचा त्रास होतो आहे, मात्र आम्हाला आराम करण्यासाठीही वेळ नाही, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हटल्या.

कित्येक लोक हे सध्या घरून काम करत आहेत. तसेच, माझे काही अधिकारी हे ग्राऊंड वर्कही करत आहेत. त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असूनही ते लोकांसाठी काम करत आहेत, असेही त्या यावेळी म्हटल्या.

हेही वाचा : वयाच्या ८०व्या वर्षी 'त्या' शिवत आहेत मास्क!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.