नवी दिल्ली - अभिनेता- राजकारणी कमल हसन यांनी आज लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या पक्षाचे घोषणापत्र आणि उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करताना त्यांनी ही माहिती दिली. 'सर्व उमेदवार माझेच चेहरे आहेत. मला रथात बसण्यापेक्षा रथ ओढण्यात अधिक रस आहे,' असे ते म्हणाले.
कमल हे ६४ वर्षांचे असून त्यांनी नोकऱ्या, महिलांना समान पगार आणि आरक्षण तसेच, शेतकऱ्यांना १०० टक्के नफा यांची मोठी आश्वासने दिली आहेत. त्यांनी ५० लाख नोकऱ्यांच्या संधी आणि महिलांना ५० टक्के आरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, महिलांना पुरुषाच्या बरोबरीने पगार देण्यात येईल, असे ते म्हणाले. त्यांनी राज्यांचे राज्यपाल आमदारांकडून निवडले जातील, असे चक्रावून टाकणारे वचन दिले आहे. याशिवाय, मोफत वायफाय, टोलमुक्त महामार्ग, लोकांच्या धान्य घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था अशी अनेक आश्वासने दिली आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला एमएनएमने तमिळनाडूतील पुदुच्चेरी येथे २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी त्यांनी स्वतःही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. 'माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, याबाबत पक्षच निर्णय घेईल,' असे त्यांनी म्हटले होते. आजच्या बैठकीत काही वेगळे ऐकायला मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.
एमएनएमची स्थापना एका वर्षापूर्वी झाली असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आणि तमिळनाडूतील ग्रामीण भागाचा विकास ही त्यांची उद्दिष्टे होती. या पक्षाने एआयडीएमके आणि डीएमके या द्वविडियन पक्षांशी युती केलेली नाही. हसन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपशीही युती करणे टाळले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 'मोदी हे 'श्रीमंतांचे चौकीदार' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांना भेटत नाहीत. तसेच, तमिळनाडूतील युवकांना #GoBackModi कॅम्पेनसाठी ट्विटरवर येण्यास भाग पाडणे, हे मोदींचे सर्वांत मोठे यश आहे,' असे म्हणत त्यांनी मोदींचा उपहास केला.
लोकसभा निवडणूक लढणार नाही, सर्व उमेदवार हे माझेच चेहरे - कमल हसन
या आठवड्याच्या सुरुवातीला एमएनएमने तमिळनाडूतील पुदुच्चेरी येथे २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी त्यांनी स्वतःही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. 'माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, याबाबत पक्षच निर्णय घेईल,' असे त्यांनी म्हटले होते.

Conclusion: