नवी दिल्ली - जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्याने नातेवाईकांना युवकाचा मृतदेह विच्छेदन करणाऱ्यांसाठी हातगाडीवरून नेण्याची वेळ आली. मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील गंज बासौदा येथे ही घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी मालगाडी खाली आल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता.
मंगल आणि छोटू हे दोघे सकाळी मंदिरात दर्शनासाठी जात होते. गंज बसौदा स्थानकावरील मालगाडीखाली आल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मंगलचा मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयाकडे शववाहिका मागितली. मात्र, रुग्णालयाने वाहन उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने नातेवाईकांना मंगलचा मृतदेह विच्छेदन करणाऱ्यासाठी हातगाडीवरून न्यावा लागला आहे.