ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत, बुधवारी माध्यमिक विद्यालये सुरू होणार - Article370Revoked

आज जम्मू-काश्मीरच्या माहिती व जनसंपर्क संचालक अधिकारी सईद सेहरिश असगर यांनी राज्यात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे म्हटले आहे.

सईद सेहरिश असगर
author img

By

Published : Aug 19, 2019, 8:26 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात कोणत्याही हिंसात्मक घटना घडू नये, म्हणून सैन्य तैनात करण्यात आले आहे. यावर 'जम्मू अॅण्ड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट'ची नेता शेहला राशीद हिने सैन्यदलावर अनेक आरोप केले होते. यावर भारतीय लष्काराने हे आरोप फेटाळले असून आज जम्मू-काश्मीरच्या माहिती व जनसंपर्क संचालक सईद सेहरिश असगर यांनी राज्यात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे म्हटले आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेची संबंधित कोणतीही कोणतीही वाईट घटना घडली नसून सर्व काही सुरळीत आहे. या परिस्थितीमध्ये जनता सहकार्य करत असून काही लोक मुद्दाम अफवा पसरवत आहेत. लोकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सईद सेहरिश असगर यांनी केले आहे.

'भारतीय लष्कर रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसून तरुणांना पकडून नेत आहे. तसेच, लुटमारही करत आहे. हेतूपुरस्सर घरातील पीठ ओतून देत आहेत. तांदळामध्ये तेल मिसळत आहेत,' असे शेहला राशीद हिने पोस्टमध्ये लिहिले होते.

  • Syed Sehrish Asgar, Director of Information & Public Relations Jammu & Kashmir: No incident of law and order has been reported in the Jammu region. https://t.co/8PK79IYRNq

    — ANI (@ANI) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर शेहलाचे आरोप आम्ही फेटाळले आहेत. समाजविघातक व्यक्ती आणि संस्थांकडून अशा प्रकारच्या सत्यता पडताळणी न केलेल्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. जनतेला चिथावणी देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कृत्ये केली जातात,' असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, प्राथमिक शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी माध्यमिक शाळाही उघडल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.