पणजी - गोवा सरकार म्हादई नदीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. त्याबरोबरच राज्यतील अन्य नद्या छोट्या होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मुळ स्वरूप कायम ठेवत प्रदूषण राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पर्वरी येथे केले. सातव्या गोवा पर्यटन महोत्सवात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
हे ही वाचा - पाण्यावरून दोन भाजपशासित राज्यात वाद उकळला; गोवा सरकारची आक्रमक भूमिका
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळविल्यामुळे हा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. तोच धागा पकडत पर्यावरण महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, म्हादई नदीबाबत गोवा सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. त्याबरोबरच राज्यातील गोड्या पाण्याचे मोठे प्रमाण असलेल्या नद्या वाढत्या मानवी अतिक्रमणामुळे लोप पावत आहे. नद्यांचे प्रदूषण रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता जर नदी प्रदूषण रोखले नाही तर कधीच शक्य नाही. यासाठी नद्या आणि पाणी वाचविण्यासाठी जागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी आणि हवेचे प्रदूषण होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा - राज्याच्या शिक्षण सचिव गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थीनी, प्रशासन अनभिज्ञ
एखाद्या सामाजिक उपक्रामासाठी सरकारचा पाठिंबा सदैव असणार आहे. खूप कमी लोक एखाद्या समाजपयोगी कामासाठी काम करतात. शालेय स्तरावर आज पर्यावरण जागृतीची नितांत गरज आहे. यावयातच मनात चांगले विचार रुजविल्यास भविष्यात लाभ होतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हे ही वाचा - राज्याच्या शिक्षण सचिव गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थीनी, प्रशासन अनभिज्ञ
यावर्षीच्या पर्यावरण महोत्सवाची 'पाणी' ही संकल्पना आहे. यावेळी आयोजित चित्रपट स्पर्धेत 53 जणांनी सहभाग नोंदवला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने 'आमोरी' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश भोसले आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा - गोव्यातील गणेशोत्सवासाठी सुरक्षेचा आढावा; पोलिसांच्या गणेश मंडळांना सुरक्षेच्या सूचना
यावेळी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, धर्माशंद वेर्णेकय, रिटा मोदी, शेरू शिरोडकर , प्रकाश कामत आणि कलाकृतीच्या प्रेरणा पावसकर आदी उपस्थित होते. दिवसभर चालणाऱ्या या महोत्सवात पर्यावरणावर आधारित माहितीपट, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. महोत्सवात संजय स्कूलची विशेष मुले सहभागी झाली होती. त्यांना मुख्यमंत्र्यांचे भाषण शिक्षिका सांकेतिक भाषेत समजावून सांगत होत्या.