ETV Bharat / bharat

नितीश कुमारांचा भाजपला 'दे धक्का'; तिहेरी तलाक विधेयकास समर्थन नाही

author img

By

Published : Jun 14, 2019, 10:28 AM IST

भाजपला राज्यसभेत बहुमत नाही. हे विधेयक राज्यसभेत पारित न झाल्यास सरकार पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांचा भाजपला 'दे धक्का

नवी दिल्ली - तिहेरी तलाक मुद्द्यावर राज्यसभेत सरकारचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल (यु) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी घेतली आहे. बिहारचे मंत्री श्याम रजक यांनी याविषयी माहिती दिली. नितीश कुमारांचा जनता दल हा पक्ष हे भाजपप्रणीत एनडीए आघाडीचा सदस्य आहेत. जद (यु)चा हा निर्णय भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल ( गुरूवार) तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी दिली आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. लोकसभेत या विधेयकाला मंजूरी मिळाली असली तरी राज्यसभेवर हे विधेयक प्रलंबितच आहे. यावेळी राज्यसभा या विधेयकाचे समर्थन करेल आणि ते पास होईल असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

राज्यसभेवर तिहेरी तलाक विधेयक प्रलंबित आहे. मात्र, आता नितीश कुमारांनी या विधेयकाला समर्थन न देण्याची भूमिका घेतल्याने ते पारित होण्यास अडचणी येऊ शकतात. भाजपला राज्यसभेत बहुमत नाही. हे विधेयक राज्यसभेत पारित न झाल्यास सरकार पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. आम्ही या विधेयकाच्या विरोधात असून त्याविरुद्ध लढा देत राहू अशी प्रतिक्रिया बिहारचे मंत्री श्याम रजक यांनी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपासून नितीश कुमार यांची एनडीएतील भूमिका संदिग्ध राहेलेली आहे. त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातही सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर आगामी काळात होणाऱ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केल्याने नितीश कुमार आणि भाजप यांच्यात तेढ निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, बिहारमध्ये नितीश यांचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असून केंद्र सरकारडून आता नितीश यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Intro:Body:

Nat 08

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.