ETV Bharat / bharat

निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या, आई आशा देवींची सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राकडे मागणी - convicts in Nirbhaya gang rape

सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना फाशी शिक्षा सुनावल्यापासून अडीच वर्षे लोटली आहेत. तर, त्यांची पुनरावलोकन याचिका फेटाळल्यापासून १८ महिने होऊन गेले आहेत. त्यामुळे आता या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी केल्याचे आशा देवी यांनी माध्यमांना सांगितले.

निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या

author img

By

Published : Dec 13, 2019, 8:27 AM IST

नवी दिल्ली - निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी तिच्या आई आशा देवी यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली.

सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना फाशी शिक्षा सुनावल्यापासून अडीच वर्षे लोटली आहेत. तर, त्यांची पुनरावलोकन याचिका फेटाळल्यापासून १८ महिने होऊन गेले आहेत. त्यामुळे आता या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी केल्याचे आशा देवी यांनी माध्यमांना सांगितले.

निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या, आई आशा देवींची सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राकडे मागणी

निर्भयाच्या गुन्हेगारांपैकी अक्षय कुमार याच्या पुनरावलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्भयाच्या आईने ही मागणी केली आहे.

न्यायालयाला त्या गुन्हेगाराची पुनरावलोकन याचिका ऐकावी लागणार आहे. न्यायालयाने ती आधीच फेटाळायला हवी होती, असे आम्हाला वाटते. मात्र, न्यायालयाच्या निर्णय मान्य करण्याखेरीज आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. आम्ही मागील सात वर्षांपासून आमच्या मुलीसाठी लढा देत आहोत. आता न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या अंमलबजावणीची तारीख लवकर जाहीर करावी.

जलदगती न्यायालयांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन दिले होते. जलदगती न्यायालये स्थापन तर झाली. मात्र, त्यामध्ये न्यायाधीशांची संख्या खूप कमी आहे, असेही त्या म्हणाल्या.

निर्भया पॅरामेडिकलची विद्यार्थिनी होती. १६ डिसेंबर २०१२ ला तिचे अपहरण करून बलात्कार करून तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात ६ जण दोषी होते. यापैकी अल्पवयीन गुन्हेगाराला किशोर गुन्हेगारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. इतर पाच जणांपैकी एकाने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर, उर्वरित चौघांना न्यायालयाने २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या ४ जणांना तत्काळ फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

या ४ जणांपैकी विनय शर्मा या गुन्हेगाराने मागील महिन्यात दया अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याने तो मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.