नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी दिल्लीमधील न्यायालयाने नवी तारीख जाहीर केली आहे. आरोपींना आता एक फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या आई म्हणाल्या, की आरोपींना जे हवे होते तेच होत आहे. तारखेवर तारखा पुढे जात आहेत. आपल्या देशातील व्यवस्थाच अशी आहे, की आरोपींचेच म्हणणे ऐकून घेतले जाते.
-
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Jo mujrim chahte the vahi ho raha hai...tareek pe tareek, tareek pe tareek. Humara system aisa hai ki jahan convict ki suni jaati hai. pic.twitter.com/y3ZdvN52mV
— ANI (@ANI) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Jo mujrim chahte the vahi ho raha hai...tareek pe tareek, tareek pe tareek. Humara system aisa hai ki jahan convict ki suni jaati hai. pic.twitter.com/y3ZdvN52mV
— ANI (@ANI) January 17, 2020Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Jo mujrim chahte the vahi ho raha hai...tareek pe tareek, tareek pe tareek. Humara system aisa hai ki jahan convict ki suni jaati hai. pic.twitter.com/y3ZdvN52mV
— ANI (@ANI) January 17, 2020
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज (शुक्रवार) फेटाळली. त्यानंतर या आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे तिहार तुरूंग प्रशासनाने दिल्ली सरकारला फाशीच्या शिक्षेबाबत तारीख आणि वेळ निश्चित करण्याची मागणी केली. दिल्ली न्यायालयाने आरोपी मुकेशला आपली दया याचिका फेटाळली गेल्याची माहिती मिळाली आहे का, हे नक्की करण्यासाठी तुरूंग प्रशासनाला वेळ दिला. ते नक्की झाल्यानंतरच फाशीची वेळ आणि तारीख नक्की करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार तिहार तुरूंग प्रशासनाने आरोपी मुकेशला त्याची दया याचिका फेटाळली गेल्याचे सांगितले असल्याचे स्पष्ट केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार आता एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या आरोपींना फाशी होणार आहे.
दरम्यान, चार आरोपींपैकी एक असलेल्या पवन याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. त्याविरोधात आता त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा : मला राजकारणात काहीही रस नाही; 'निर्भया'च्या आईने फेटाळल्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या अफवा..