ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलली, दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय..

क्युरेटिव याचिका आणि दया याचिका दाखल करण्यास केलेल्या दिरंगाईमुळे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवनच्या वकीलांना खडसावले. आज सकाळीच, सर्वोच्च न्यायालयाने पवनची क्युरेटिव याचिका फेटाळली होती.

author img

By

Published : Mar 2, 2020, 5:40 PM IST

Updated : Mar 2, 2020, 5:59 PM IST

Nirbhaya case A Delhi court stays the execution of the 4 convicts
निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी पुन्हा पुढे ढककली..

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणी शिक्षा जाहीर झालेल्या आरोपींची फाशी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी पवनने आज (सोमवार) राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्यामुळे, या चौघांनाही उद्या होणारी फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.

आपली संपूर्ण व्यवस्थाच गुन्हेगारांचे समर्थन करते - निर्भयाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया..

न्यायालयाने चौथ्यांदा आरोपींची याचिका फेटाळल्यामुळे, आपली संपूर्ण व्यवस्थाच गुन्हेगारांची समर्थन करणारी आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. न्यायालय स्वतःच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई का करत आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वारंवार गुन्हेगारांची टळणारी फाशी हा आपल्या व्यवस्थेचा पराभव असल्याचे त्या यावेळी म्हटल्या.

  • Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Why is the court taking so much time to execute its own order to hang the convicts? Repeated postponing of the execution shows the failure of our system. Our entire system supports criminals. pic.twitter.com/JFmU1qSU46

    — ANI (@ANI) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याआधी क्युरेटिव याचिका आणि दया याचिका दाखल करण्यास केलेल्या दिरंगाईमुळे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवनच्या वकीलांना खडसावले. आज सकाळीच, सर्वोच्च न्यायालयाने पवनची क्युरेटिव याचिका फेटाळली होती.

तसेच, आज ट्रायल कोर्टाने आरोपी पवन आणि अक्षय कुमार सिंग यांच्या याचिका फेटाळल्या. आपल्यावरील फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करावे अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती.

दरम्यान निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 17 फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

हेही वाचा : कोरोना विषाणू : देशात आढळले दोन नवीन रुग्ण..

Last Updated : Mar 2, 2020, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.