ETV Bharat / bharat

पाटणा प्राणीसंग्रहालयाच्या फेसबुक,युट्युब चॅनेलवर 9 लाख लोकांनी दिली भेट - संजय गांधी जैविक उद्यान

प्राणीसंग्रहालयाच्या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनेल वर भारतातील आणि जगातील 9 लाख प्राणीमित्रांनी भेट दिली आहे. युट्युब चॅनेलवरुन आतापर्यंत 6 भाग प्रसारित झाले आहेत. यामध्ये वाघ, पक्षी,चिंपाझी,जिराफ,गेंडा, वाघ आणि हत्ती यांच्या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

nine-lakh-people-undertook-virtual-tour-of-patna-zoo-in-a-week-official
पाटणा प्राणीसंग्रहालयाच्या फेसबुक,युट्युब चॅनेलवर 9 लाख लोकांनी दिली भेट
author img

By

Published : May 3, 2020, 12:14 PM IST

पाटणा- संजय गांधी जैविक उद्यानाच्या युटयुब आणि फेसबुक पेजवर सात दिवसांमध्ये 9 लाख लोकांनी भेट दिली आहे. लोकांनी या पेजेसवर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत, अशी माहिती वनविभागाचे मुख्य सचिव दिपक कुमार सिंग यांनी दिली.

9 लाख भारतातील आणि जगातील प्राणीमित्रांनी भेट दिली आहे.युट्युब चॅनेलवरुन आतापर्यंत 6 भाग प्रसारित झाले आहेत. यामध्ये वाघ, पक्षी,चिंपाझी,जिराफ,गेंडा, वाघ आणि हत्ती यांच्या बद्दल माहिती देण्यात आली आहे.सात दिवसांपूर्वी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर लहान मुले हे व्हिडिओ पाहत आहेत. त्यांना प्राण्यांविषयी आणि त्यांच्या अन्नसाखळीबद्दल माहिती होईल, असे मत दिपक कुमार सिंग यांनी व्यक्त केले. पाटणा प्राणीसंग्रहालयात 800 प्राणी आहेत. यांच्याबद्दल विविध भागामध्ये व्हिडिओ प्रसारित करण्यात येणार आहेत. प्रत्येक भागात प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास, अन्न, प्रजनन साखळी याविषयी माहिती देण्यात येईल.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने प्राणीसंग्रहालय बंद आहे. याकाळात आम्ही हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे, असेही दिपक कुमार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.