ETV Bharat / bharat

'कोविड-१९'च्या उपचारासाठी विषाणू प्रतिबंधक 'रेमडेसिवीर' आणि दाह विरोधी संयुक्त उपचाराच्या अभ्यासाला सुरुवात..

कोरोना विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरुच असताना अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) गिलियड सायन्सेसच्या विषाणू प्रतिबंधक औषध रेमडेसिवीर आणि अँटी इंफ्लेमेटरी / दाह विरोधी उपचारपद्धती 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचाराला मान्यता दिली आहे.

NIH undertakes study of antiviral remdesivir with anti-inflammatory drug to treat COVID-19
'कोविड-१९'च्या उपचारासाठी विषाणू प्रतिबंधक 'रेमडेसिवीर' आणि दाह विरोधी संयुक्त उपचाराच्या अभ्यासाला सुरुवात..
author img

By

Published : May 12, 2020, 2:06 PM IST

हैदराबाद : जग कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटाला तोंड देत असताना, कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गिलियड सायन्सेचेसचे विषाणू प्रतिबंधक औषध रेमडेसिवीर आणि अँटी इंफ्लेमेटरी / दाह विरोधी उपचारपद्धती 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचाराला मान्यता देण्यात आली असून त्याचा रुग्णावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरु केला असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) म्हटले आहे.

कोविड-१९वर उपचार घेत असलेल्या अमेरिकेतील प्रौढांवर ही चाचणी घेण्यात येणार असून त्यासाठी १,००० पेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच रेमडेसिवीर आणि 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचार पद्धतीने आणखी काही फायदे मिळतात का ते ह्या चाचणीच्या माध्यमातून तपासण्यात येणार असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‌ॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेइन्फेक्शस डिसिसीजचे संचालक अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे.

रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांपैकी रेमडेसिवीरचे औषध दिलेले रुग्ण इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे होत असल्याबद्दल ठोस डेटा उपलब्ध असल्याचे फॉसी यांनी म्हटले आहे.

तसेच एलि लिलि कंपनीच्या ओलुमियंट या ब्रँड खाली उपचार करण्यात येत असलेले 'बॅरिकिटिनीब' कोविड १९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती म्हणून पुढे येत आहे.

कोविड-१९वरील औषध उपलब्ध नसल्याने कोरोनामुळे उद्भवणाऱ्या श्वसन विकाराने अमेरिकेत आतापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेमडेसिवीर औषधाकडून अनेक अपेक्षा आहेत.

रेमडेसिवीरच्या उपचारपद्धतीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर रेमडेसिवीरचा २००-मिलिग्रॅम IV चा एक डोस आणि दररोज १०० मिलिग्रॅमचा एक डोस या पद्धतीने १० दिवसांसाठी उपचार केले जातात. तर बॅरिकिटिनीब पद्धतीत १४ दिवसांकरिता ४ मिलिग्रॅमचा एक डोस तोंडाद्वारे दिला जातो.

मात्र, दोघांच्या एकत्रित उपचारांमुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो का हे चाचणीद्वारे अभ्यासण्यात येणार आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाण कमी होण्याबरोबरच आणखी काही फायदे दिसून येतात का याचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या महिन्याच्या सुरूवातीसच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोविड-१९च्या उपचारासाठी रेमडेसिवीरला मान्यता दिली आहे. तसेच यामुळे धोका कमी होण्यास मदत होत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : कोरोनावरील लस शोधण्यासाठी 'भारत बायोटेक' घेणार पुढाकार..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.