ETV Bharat / bharat

देविंदर सिंग प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; तारिक अहमद मीरला अटक - देविंदर सिंग प्रकरण

दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी काश्मीर पोलीस आणि एनआयएने तारिक अहमद मीरला अटक केली आहे.

NIA arrests one more in ex-DSP Davinder Singh case

author img

By

Published : Apr 30, 2020, 1:43 PM IST

श्रीनगर - दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज काश्मीर पोलीस आणि एनआयएने तारिक अहमद मीरला अटक केली आहे. त्याच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी तारिक अहमद मिरला अटक केली आहे. मीरचे देविंदर सिंगशीही संबंध होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

जम्मू काश्मीर पोलीस दलात सिंग पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. जानेवरीमध्ये दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर नावेद बाबू, आतिफ आणि इरफान असे तीघेजण त्यांच्या गाडीतून जात होते. या सर्वांना सिंग यांनी त्राल आणि जम्मू येथील आपल्या घरी ही आश्रय दिला होता.

देविंदर सिंह यांना अटक केली तेव्हा त्यांच्या गाडीत शस्त्रसाठी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता आणखी शस्त्रसाठा सापडला. या अधिकाऱ्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यातही आले होते. सध्या ते श्रीनगर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.