नवी दिल्ली - उघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) कठोर झाले आहे. एनजीटी चेअरपर्सन जस्टिस आदर्श कुमार गोयल अध्यक्ष असलेल्या बेंचने पर्यावरण संबंधी समस्यांच्या निवारणासाठी एक मोबाईल अॅप लाँच करण्यासाठीचे आदेश दिले आहेत. तसेच उघड्यावर कचरा जाळण्याच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी दिल्ली प्रदूषण समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. आणि त्यावर नियमितपणे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
...या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती याचिका -
पर्यावरण संबंधी समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जसोला निवासी कल्याण संघ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे, ओखला सीवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघड्यावर कचरा जाळला जात आहे. यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हेही वाचा - ममता बॅनर्जी यांचा सरकारवर हल्लाबोल, बंगालमध्ये 'एनआरसी' लागू होऊ देणार नाही
याचिकेवर सुनावणी करताना एनजीटीने म्हटले आहे, अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा जाळणाची शक्यता आहे त्याठिकाणी त्यांनी नियमितपणे लक्ष ठेवणे. त्यामुळे अशा घटनांमुळे आळा घातल्यास पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होईल.
अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवावे -
आपल्या पहिल्या सुनावणी दरम्यान एनजीटी ने याचिका फेटाळली होती. यानंतर दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने एनजीटीला सादर केलेल्या आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे, अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान, उघड्यावर कचरा जाळण्याची कोणतीही घटना आढळून आली नाही. अधिकाऱ्यांच्या पाहणी दरम्यान त्याठिकाणी कचरा जाळण्यात आला नसेल, अशी शक्यता एनजीटीने यावर व्यक्त केली आहे. मात्र, तरीदेखील याप्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.