नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी त्यांच्या 2020 या वर्षाच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे कामकाजाचे दिवस पूर्ण भरलेले नाहीत. ते भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
देशभरात लोकडाऊनची घोषणा झाल्यानंतर लवादाने त्यांचे काम कमी केले आहे. फक्त तातडीच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे लवादाने म्हटले आहे.
जून 2020 महिन्यातील शनिवार रविवारच्या सुट्ट्या आणि राजपत्रित सुट्ट्या वगळता एनजीटी पूर्ण काळ कार्यरत राहणार आहे. दुसरा शनिवार वगळता इतर सर्व शनिवारी एनजीटी सुरू राहील. सध्या करण्यात आलेल्या या घोषणेमध्ये शासनाकडून येणाऱ्या नवीन निर्देशांनुसार सुधारणा होऊ शकतील, असेही यामध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सध्या सुरू असलेला लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.