रायपूर(छत्तीसगड) - राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय मेकाहारामध्ये रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या होत्या. मेकाहारा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभाराचा फटका तेथील परिचारिकांना बसत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे परिचारिकांच्या जीवाला धोका निर्माण जाला आहे. वापरण्यात आलेले पीपीई किट कोविड वार्डजवळच फेकून देण्यात येतात आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. रुग्णालयातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट न लावता उघड्यावर फेकले जाते, असा आरोप परिचारिकांनी केला आहे.
कोरोना संकटकाळात फ्रंटलाईन वॉरिअर्स म्हणून लढत असताना देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिचारिकांनी केला. कोरोना वॉरिअर्सच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले जात नाहीत. या सर्व प्रकारामुळे मनोबल घटत असून याचा परिणाम रुग्णांवर देखील होऊ शकेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
कोविड वार्डजवळच वापरलेल्या पीपीई किटची विल्हेवाट
डॉक्टर्स आणि इतरांनी वापरलेल्या पीपीई किटची विल्हेवाट कोविड वार्डजवळच लावली जाते, असे कोविड वार्डात काम करणाऱ्या नर्सेसनी सांगितले. याशिवाय अन्नाची योग्य विल्हेवाट न लावता ते उघड्यावर फेकले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पीपीई किटची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावली जात नाही. यामुळे जीवाला धोका असल्याचे परिचारिकांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे मानले जाते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सर्वात महत्वाचे आहेत. रुग्णालय सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करते. मात्र, परिचारिकांना प्रवास करण्यासाठी असलेल्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा आरोप परिचारिकांनी केला. राज्यात दररोज 150 रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभाग परिचारिकांना सोयी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप केला जातोय. सुरक्षेच्या उपाययोजना गांभीर्याने लागू केल्या नाही तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.