ETV Bharat / bharat

कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची गरज आहे का? काय आहे इतर देशांची परिस्थिती - corona news

एखाद्या कोरोना संशयित व्यक्तीची लवकर चाचणी झाली तर त्या व्यक्तीपासून इतरांना होणारा प्रसार तत्काळ रोखता येऊ शकतो. मात्र, भारतामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव समाजात म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाला नसल्याचे म्हणत इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्चने बहुसंख्य कोरोना चाचणी घेण्यास नकार दिला आहे.

कोरोना चाचणी
कोरोना चाचणी
author img

By

Published : Apr 2, 2020, 9:03 PM IST

मुंबई - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे 14 दिवसांमध्ये दिसून येतात. त्यामुळे जर एखाद्या कोरोना संशयित व्यक्तीची लवकर चाचणी झाली तर त्या व्यक्तीपासून इतरांना होणारा प्रसार तत्काळ रोखता येऊ शकतो. मात्र, भारतामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव समाजात म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड झाला नसल्याचे म्हणत इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्चने बहुसंख्य कोरोना चाचणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे खरच मोठ्या प्रमाणात चाचणी गरजेची आहे का? असा प्रश्न उभा राहतो.

कोरोना चाचणी कशी घेतात ?

जर एखाद्या व्यक्तीला ताप, शिंका, श्वास घेण्यास त्रास किंवा घसा दुखत असेल आणि तो कोरोना संशयित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात. ज्यामध्ये घशातील, नाकातील स्त्राव (स्वॅब), थुंकी किंवा अन्य वैद्यकिय नमुने गोळा केले जातात. त्यावरून त्या व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही, हे सिद्ध होते. अनेक वेळा अचूकतेसाठी एकापेक्षा जास्त चाचण्याही घेतल्या जाऊ शकतात.

भारताची कोरोना चाचणीची स्थिती काय?

भारताने आत्तापर्यंत 50 हजार नागरिकांची कोरोना चाचणी घेतली आहे. यामध्ये दरदिवशी वाढ होत आहे. सरकारी आणि खासगी चाचणी केंद्रांची संख्या 200 पेक्षा कमी आहे. भारत जगात लोकसंख्येच्या मानाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अनेक लहान देशांनी जास्त चाचणी केल्या आहेत. भारताने दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 20 चाचण्या घेतल्या आहेत. ही संख्या लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहे. त्यामुळे आणखी लोकांना कोरोना झाला असून फक्त चाचणी न केल्यामुळे संसर्ग झाल्याचे निदान होत नसावे, अशी शक्यता आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर चाचणी घेण्यात येत आहे.

कोरोनाची चाचणी घेण्याचे फायदे काय आहेत?

  • एखाद्याला कोरोना झाल्याचे तत्काळ स्पष्ट होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधने आणून त्याचे विलगीकरण करता येते. त्यामुळे इतरांचे कोरोनापासून संरक्षण होते.
  • रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करता येतात. आजार बळावण्याच्या आतच उपचार केल्याने रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते.
  • कोरोनाचा प्रसार किती वेगाने होत आहे, याचा प्रशासनाला अचूक अंदाज येतो. त्यानुसार नियोजन करता येते.
  • दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणात नागरिकांची चाचणी घेतली. त्यामुळे प्रसार रोखण्यास मदत झाली.
  • मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी घेतल्याने प्रसार नक्की किती झाला आहे. याचा अंदाज येईल. अन्यथा कोरोनाचा प्रसार किती झाला याचा अंदाज प्रशासनाला येणार नाही.

कोणकोणत्या देशांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची चाचणी केली?

  • अमेरिकेने आत्तार्यंत सर्वात जास्त नागरिकांची कोरोना चाचणी घेतली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 29 मार्च 2020 पर्यंत 7 लाख 62 हजार नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अमेरिकेत सुमारे 2 लाख नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • दक्षिण कोरियाने आत्तापर्यंत 3 लाख 94 हजार नागरिकांची चाचणी केली आहे. दक्षिण कोरियातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त चाचणी केंद्रे आहेत.
  • कॅनडाने 1 लाख 84 हजार नागरिकांची कोरोना चाचणी घेतली आहे.
  • ऑस्ट्रेलियाने 1 लाख 38 हजार नागरिकांची चाचणी घेतली आहे.
  • मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झालेल्या इराणणे 80 हजार नागरिकांची चाचणी घेतली आहे.
  • संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने 16 मार्च पर्यंत 1 लाख 25 हजार नागरिकांची चाचणी केली आहे.
  • जर्मनी 4 लाख 83 हजार चाचणी, इटली 4 लाख 29 हजार
  • स्पेनने 3 लाख 50 हजार नागरिकांची चाचणी घेतली आहे.
  • रशियाने 2 लाख 43 हजार नागरिकांची चाचणी केली आहे.

दर 10 लाख नागरिकांमध्ये कोणत्या देशांनी किती चाचणी घेतल्या ?

नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि युएईने सर्वात जास्त चाचणी घेतली आहे. कोणत्या देशाने किती नागरिकांची चाचणी घेतली ते तेथील लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून आहे. उदा: अमेरिकेने सर्वात जास्त कोरोना चाचणी घेतल्या आहेत. मात्र, अमेरिकेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा एकून चाचण्यांचा आकडा कमी दिसत असला तरी त्या देशातील चाचण्या एकून लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त असू शकतात.

त्यानुसार नॉर्वे या देशाने दर 10 लाख लोखसंख्ये मागे 15 हजार 386 चाचण्या घेतल्या आहेत.

भारताने दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 20 चाचण्या घेतल्या आहेत.

इटली, स्पेनने दर 10 लाख लोकसंख्येमागे 7 हजार नागरिकांची कोरोना चाचणी घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.