ETV Bharat / bharat

20 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या महोबात बोअरवेमध्ये पडून मुलाचा मृत्यू झाला आहे. 4 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून काढण्यासाठी गेल्या 20 तासांपासून बचाव मोहीम चालू होती.

उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:15 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या महोबात बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 20 तासाच्या मेहनतीनंतर एनडीआरएफच्या पथकाने 25 फूट खोल बोअरवेलमधून 4 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

उत्तर प्रदेशच्या महोबात बोअरवेमध्ये पडून मुलाचा मृत्यू

4 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून काढण्यासाठी गेल्या 20 तासांपासून बचाव मोहीम चालू होती. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळीच थांबले होते आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स लखनऊहून मदतीसाठी महोबा येथे पोहोचल्या होत्या. यासह, डॉक्टरांची टीम मुलाच्या संपर्कात होती. मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ नये, म्हणून ऑक्सिजन दिले जात होते. तरीही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत.

खेळता-खेळता अचानक बोअरवेलमध्ये पडला -

जिल्ह्यातील कुलपहर पोलीस स्थानक परिसरातील बुधोरा गावात शेतकरी भागीरथ कुशवाह हे आपल्या कुटूंबासह शेतात गहू पिकाला पाणी घालत होते. तेव्हा भगीरथ यांचा चार वर्षाचा मुलगा घनेंद्र शेतात खेळता-खेळता अचानक बोअरवेलमध्ये पडला. भगीरथ यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच डॉक्टर व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 20 तास बचावकार्य करूनही घनेंद्रला वाचवता आले नाही.

मध्य प्रदेशमध्येही बोअरवेमध्ये पडून मुलाचा मृत्यू -

मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावात बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाच वर्षांच्या मुलाचा 8 नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. त्याला वाचवण्यासाठी 90 तास प्रयत्न करण्यात आले होते. तसेच प्रशासनाने घटनास्थळावर कलम 144 लागू केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.