श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी 'पाकिस्तानपेक्षा राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून धोका जास्त' असल्याचे म्हटले आहे. अनंतनाग लोकसभा मतदार संघात कुंड घाटी येथील सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
'काही लोक जम्म-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानच्या बंदुकीपेक्षाही या लोकांपासून अधिक धोका आहे. राज्यासमोर आता या लोकाच्या रूपाने संकट उभे राहिले आहे. तेव्हा लोकांनी लोकसभेत आपला प्रतिनिधी निवडताना योग्य निर्णय घेतला पाहिजे.'
आर्टिकल ३७० आणि ३५-ए यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाने पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन भाजपचा जाहीरनामा 'संकल्प पत्र' यामध्येही देण्यात आले आहे.