रांची (झारखंड) - जिल्ह्यातील ग्रामीण भागात सतत नक्षली कारवाया होत आहेत. रांचीच्या तुपुदाना भागात नक्षलवाद्यांनी पोस्टरबाजी करत दहशत निर्माण केली आहे. नक्षलवाद्यांनी रांचीच्या तमाडमध्ये पोलिसांच्या एका खबऱ्याची हत्या केली. त्यानंतर पोस्टरबाजी करत पीएलएफआय या नक्षली गटाने रांचीच्या तुपुदानामध्ये दहशत पसरवली आहे.
तुपुदानाच्या टोरियन शाळेजवळ असलेल्या जंगलाजवळ पीएलएफआय गटाने पोस्टरबाजी करत खदान मालक आणि क्रशर मालकाला धमकी दिली आहे. पोस्टरमध्ये असे लिहिले आहे, की नक्षली संगटनेच्या आदेशाशिवाय कोणतेच काम सुरू होणार नाहीत. जर काम सुरू केले तर परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकी यात देण्यात आली आहे. शेवटी पीएलएफआय संगटनेच्या एरिया कमांडर विशालचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच तुपुदाना पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहम्मद तारिकसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.