नवी दिल्ली - 'दिवाला और अक्षमता संहिता' अध्यादेशाच्या दुसऱ्या संशोधनला अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी समर्थन दिले आहे. या अध्यदेशाच्या माध्यमातून दिवाळं निघालेल्या कंपन्यांना दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नवनीत कौर राणा म्हणाल्या, कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक उद्योगधंद्यांवर संकट आले. यात अनेक कंपन्यांचे दिवाळं निघाले. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. एक महिला असल्याने मी समजू शकते, की अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याने घरात कशा पद्धतीचे वातावरण तयार होते. यामुळेच मी या अध्यादेशाला पाठींबा देत आहे. सोबतच कोणत्याही कंपनीतून कोणत्याही कामगाराला, कर्मचाऱ्याला कमी करण्यात येऊ नये, अशी आशा देखील या बीलाच्या निमीत्ताने व्यक्त करते. असे त्या म्हणाल्या आहेत.
सहकारातील स्वाहाकार थांबवा, बँक बुडव्या संचालक मंडळावर व कर्ज बुडविणाऱ्या धनदांडग्यांवर कठोर कार्यवाही करा, कोरोना महामारीत आवक नसल्यामुळे कर्ज घेतलेल्या गरीब-मध्यमवर्गीय व सर्वसामान्य ग्राहकांना मोरिटेरियम कालावधी 6 महिने ते एक वर्ष वाढवून द्या, अशी मागणीही त्यांनी लोकसभेत केली आहे.