ETV Bharat / bharat

काँग्रेस आमदारांचं नाराज होणं स्वाभाविक; मात्र, लोकशाही वाचविण्याची गरज - अशोक गेहलोत

सचिन पायलट व इतर बंडखोर आमदारांच्या परतीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, मंगळवारी रात्री आमदारांना त्यांनी लोकांच्या हितासाठी काम करावे लागेल, असे सांगितले आहे. पायलट आणि राहुल गांधी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत 14 ऑगस्टपासून होणाऱ्या महत्त्वपूर्ण विधानसभा अधिवेशनापूर्वी सुमारे एक महिन्यापासून चालणाऱ्या राजस्थान सत्तासंकटात मैत्रीपूर्ण ठराव झाल्याचे दिसून आले.

cm ashok gehlot
अशोक गेहलोत (मुख्यमंत्री, राजस्थान)
author img

By

Published : Aug 12, 2020, 3:50 PM IST

जैसलमेर (राजस्थान) - राज्यात सुरू असलेल्या राजकीय संकटामुळे जवळपास महिनाभरापासून काँग्रेस आमदारांना एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. महिनाभर हॉटेलमध्ये थांबल्याने काँग्रेसच्या आमदारांमध्ये संतापजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना हे सहन करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी दिली.

अशोक गेहलोत (मुख्यमंत्री, राजस्थान)

सचिन पायलट व इतर बंडखोर आमदारांच्या परतीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, मंगळवारी रात्री आमदारांना त्यांनी लोकांच्या हितासाठी काम करावे लागेल, असे सांगितले आहे. पायलट आणि राहुल गांधी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत 14 ऑगस्टपासून होणाऱ्या महत्त्वपूर्ण विधानसभा अधिवेशनापूर्वी सुमारे एक महिन्यापासून चालणाऱ्या राजस्थान सत्तासंकटात मैत्रीपूर्ण ठराव झाल्याचे दिसून आले.

राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीनंतर काँग्रेसने म्हटले की, राजस्थानमधील सत्तासंकटाचा अध्याय संपला आहे. तसेच सरकारला पाठिंबा देणारे सर्व आमदार राज्याला मजबूत करण्यासाठी आणि कोविड -19 आणि इतर आर्थिक आपत्तींशी लढण्यासाठी काम करतील.

जोधपूरला रवाना होण्यापूर्वी गहलोत यांनी पत्रकारांना सांगितले की, "त्यांचे (आमदार) नाराज होणे स्वाभाविक आहे. हा भाग ज्या प्रकारे घडला त्याप्रमाणे त्यांना हॉटेल्समध्येच रहावे लागले. त्यामुळे नाराज होणे स्वाभाविक होते. मी त्यांना निवेदन केले आहे की देश, राज्य, राज्यातील लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी कधीकधी आपल्याला सहन करावे लागत आहे."

राज्यात राजकीय पेचप्रसंगाचे सावट जाणवल्यामुळे गेहलोत यांच्या छावणीतील आमदार जवळपास महिनाभरापासून हॉटेलमध्ये दाखल होते. गेलेले आमचे सहकारी परत आले आहेत आणि आम्ही एकत्र काम करू. मला आशा आहे की, सर्व जण तक्रारी मिटवून काम करतील आणि राज्याची सेवा करण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करतील, असे बंडखोर आमदारांचा संदर्भ घेऊन ते म्हणाले.

भाजपाने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा डाव आम्ही उघडकीस आणला. म्हणूनच ते त्याच्या त्यांच्या नितीमध्ये यशस्वी शकले नाही. 'सत्यमेव जयते', असेही गेहलोत यावेळी म्हणाले.

गेहलोत त्यांनी नुकतीच सर्व आमदारांना एक पत्र लिहून लोकशाही वाचविण्यासाठी आणि सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी विवेक आणि लोकांचा आवाज ऐकायला सांगितले आहे. काँग्रेस नेत्यांच्या योगदानामुळे देशात लोकशाही राखली जात आहे. ही लोकशाही देशात टिकून राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.