ETV Bharat / bharat

विशेष : प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा विपरीत परिणाम जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे.

national pollution control day
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2020
author img

By

Published : Dec 15, 2020, 9:47 PM IST

भोपाळ गॅस दृर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृती प्रित्यर्थ 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' दरवर्षी पाळण्यात येतो. १९८४ मध्ये २ आणि ३ डिसेंबरच्या रात्रीला युनियन कार्बाईड या विषारी वायू गळतीमुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, २ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय पर्यावरण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस का पाळला जातो?

प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा विपरीत परिणाम जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे. २ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणून हा दिवस भारतात पाळला जातो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे महत्त्व

प्रदूषणाचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे

भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणून हा दिवस पाळला जातो

1 डिसेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात प्रदूषित शहरे पुढीलप्रमाणे -

  1. मेरठ (उत्तर प्रदेश)
  2. मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)
  3. पितांपुरा (दिल्ली)
  4. डासना (उत्तर प्रदेश)
  5. बावना (दिल्ली)
  6. लोणी (उत्तर प्रदेश)
  7. ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश)
  8. धारुहेरा (हरियाणा)
  9. बुलंदशहर (उत्तर प्रदेश)

आपण काय केले पाहिजे?

  • कारखान्यातून निघणारे सांडपाणी नदीत न सोडणे.
  • प्रदूषण होताना आढळल्यास योग्य त्या संस्थेला कळवणे.
  • प्रदुषणाच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भर देणे.
  • नियमांची अंमलबजावणी करणे.
  • स्वच्छ औद्योगिक प्रक्रियांना प्रोत्साहन देणे.
  • प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या नियमांना प्रसिद्धी देणे.

कोरोना आणि प्रदूषण -

आधीच कोरोनाची तीव्र लाट आणि त्यात विषारी वायू प्रदूषणाची भर. हिवाळ्यात दिल्लीने जगातील सर्वांत प्रदूषित शहराचा लौकिक पटकावला. दिल्ली आणि शेजारच्या नॉयडा, गुरगाव, गाझियाबाद, फरीदाबादसह आसपासच्या शहरांतील लोकांचा श्वास कोंडणाऱ्या वायू प्रदूषणाची कारणे जुनीच आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानातील शेतांमध्ये खरीप हंगामात अखेर जाळला जाणारा कचरा म्हणजे पराट्या हे मुख्य कारण आहे. पण यामुळे पाच टक्केच प्रदूषण होत असून, बायोमास जाळणे, धूळ उडण्यासारख्या स्थानिक कारणांमुळे वायू प्रदूषण वाढले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.