ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांशी संबध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी एनआयए करणार - पोलीस अधिकारी अटकेत

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात येणार आहे. मागील आठवड्यात दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

देविंदर सिंग
देविंदर सिंग
author img

By

Published : Jan 18, 2020, 12:13 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात येणार आहे. देविंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

जम्मू काश्मीर पोलीस दलात सिंग पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. मागील आठवड्यात दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर नावेद बाबू, आतिफ आणि इरफान असे तीघेजण त्यांच्या गाडीतून जात होते. या सर्वांना सिंग यांनी त्राल आणि जम्मू येथील आपल्या घरी ही आश्रय दिला होता. या प्रकरणी काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केला आहे, मात्र, हे प्रकरण आता एनआयएकडे सोपवण्यात येणार आहे.

देविंदर सिंह यांना अटक केली तेव्हा त्यांच्या गाडीत शस्त्रसाठी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता आणखी शस्त्रसाठा सापडला. या अधिकाऱ्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यातही आले आहे. सध्या ते श्रीनगर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात होते. या प्रकरणी गुप्तचर विभागांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे.

Intro:Body:

दहशतवाद्यांशी संबध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी एनआयए करणार

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात येणार आहे. देविंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

जम्मू काश्मीर पोलीस दलात सिंग पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. मागील आठवड्यात दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. नावेद बाबू हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आणि आतिफ आणि इरफान असे तीघेजण त्यांच्या गाडीत आढळून आले. या सर्वांना सिंग यांनी त्राल आणि जम्मू येथील आपल्या घरी ही आश्रय दिला होता. या प्रकरणी काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केला आहे, मात्र, हे प्रकरण आता एनआयएकडे सोपवण्यात येणार आहे.   

देविंदर सिंह यांना अटक केली तेव्हा त्यांच्या गाडीत शस्त्रसाठी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता आणखी शस्त्रसाठा सापडला.  या अधिकाऱ्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यातही आले आहे. सध्या ते श्रीनगर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात होते. या प्रकरणी गुप्तचर विभागांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.