नवी दिल्ली - परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने नवी मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेचा संपूर्ण आराखडा, आणि त्याचे नियम व अटी केंद्र सरकारने जाहीर केले आहेत.
COVID-19 updates LIVE : देशभरातील कोरोनासंबंधीच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर..
19:38 May 05
परदेशातील भारतीयांना मायदेशी आणणार; केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केला संपूर्ण आराखडा..
19:38 May 05
19:37 May 05
19:33 May 05
19:26 May 05
हरियाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या घरात..
चंदीगड - हरियाणामध्ये आज कोरोनाच्या ३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४८वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
19:21 May 05
जम्मू-काश्मीरमध्ये आढळले १५ नवे रुग्ण..
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये आज दिवसभरात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील एक रुग्ण जम्मूमधील, तर १४ काश्मीरमधील आहेत. प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ७४१वर पोहोचली आहे. यामध्ये ४१३ रुग्ण अॅक्टिव आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिली आहे.
19:17 May 05
परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 'समुद्र सेतू' मोहीम..
नवी दिल्ली - परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'समुद्र सेतू' मोहीम पुकारली आहे. यामध्ये नौदलाच्या जलश्वा आणि मगर या जहाजांचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये माले आणि मालदीव बेटांवरील भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया ८ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
19:11 May 05
देशात अडकलेल्या पाकिस्तानींना वाघा सीमामार्गे पाठवले मायदेशी..
नवी दिल्ली - देशात अडकलेल्या १९३ पाकिस्तानी नागरिकांना आज अटारी-वाघा सीमेमार्गे मायदेशी पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी हाय कमीशनने याबाबत माहिती दिली आहे.
19:10 May 05
बिहारमध्ये अडकले महाराष्ट्रातील 40 कुटुंब; घरी परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
सितामढी (बिहार) - महाराष्ट्रातील 40 कुटुंब बिहारमध्ये झूमरचा व्यापार करण्यासाठी गेले होते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली आणि हे सर्व लोक बिहारमधील सितामढी जिल्ह्यात अडकून पडले आहेत. यातल्या अकोला जिल्ह्यातील काहींनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. घरी जावू द्या, अशी आर्त विनवणी हे मजूर करत आहेत.
18:09 May 05
तेलंगाणामधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुढील वर्गात बढती..
हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगाणा सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्यात येणार आहे.
18:02 May 05
देशातील ६५ हजारांहून अधिक कामगार परतले आपापल्या राज्यांमध्ये..
नवी दिल्ली - आतापर्यंत देशातील ६५ हजारांहून अधिक कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परत सोडण्यात आले आहे. अजूनही जे कामगार दुसऱ्या राज्यांमध्ये अडकले आहेत, ते जनसुनवाई पोर्टलवर मदतीसाठी नाव नोंदवू शकतात, अशी माहिती गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.
17:56 May 05
पंजाबमधील रुग्णांची संख्या पंधराशेच्या घरात..
चंदीगड - पंजाबमध्ये आज कोरोनाचे २१९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,४५१वर पोहोचली आहे. यांपैकी १,२९३ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तसेच, राज्यातील एकूण बळींची संख्या २५वर पोहोचली आहे, आणि दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
17:55 May 05
कर्नाटकमध्ये आज आढळले २२ नवे रुग्ण..
बंगळुरू - कर्नाटकमध्ये आज कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६७३वर पोहोचली आहे. यांपैकी ३३१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच, राज्यातील एकूण बळींची संख्या २९वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
17:07 May 05
दोन दिवसांच्या ब्रेकनंतर केरळमध्ये पुन्हा आढळले तीन नवे रुग्ण..
तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये आज कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५०२वर पोहोचली आहे. आज आढळून आलेले तीनही रुग्ण वायनाडमधील आहेत. तर, राज्यातील एकूण रुग्णांपैकी ३७ रुग्ण अॅक्टिव आहेत. राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी याबाबत माहिती दिली.
17:07 May 05
पश्चिम बंगालमध्ये दिवसभरात ८५ नवे रुग्ण, तर कोरोनाचे सात नवे बळी..
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये आज कोरोनाचे ८५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,३४४वर पोहोचली आहे. यांपैकी ९४० रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तसेच, आज झालेल्या सात मृत्यूंनंतर राज्यातील एकूण बळींची संख्या ६८वर पोहोचली आहे.
16:57 May 05
लॉकडाऊन नियमभंगांचे गुन्हे रद्द करा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
नवी दिल्ली - देशभरात लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस प्रमुख विक्रम सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.
16:01 May 05
परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राची नवी मोहीम..
नवी दिल्ली - परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार आणखी एक मोहीम सुरू करत आहे. सात मे ते १३ मे दरम्यान या मोहिमेचा पहिला आठवडा असणार आहे. यादरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय एकूण ६४ फेऱ्या करणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यादरम्यान युएईमध्ये १०, इंग्लंड, अमेरिका, बांगलादेश, मलेशियामध्ये प्रत्येकी सात; सौदी अरेबिया, सिंगापूर, फिलिपाईन्स आणि कुवैतमध्ये प्रत्येकी ५, तर ओमान, बहरीन आणि कतारमध्ये प्रत्येकी २ विमाने पाठवण्यात येणार आहेत.
ढाका ते दिल्लीसाठी १२ हजार रुपये, लंडन ते मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, आणि दिल्लीला येण्यासाठी ५० हजार रुपये; तर शिकागो-दिल्ली-हैदराबाद या मार्गासाठी एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
16:00 May 05
कोरोना इफेक्ट : उत्तर प्रदेशमध्ये भाजी विक्रेते ठरताहेत कोरोना संसर्गाचे 'सॉफ्ट टार्गेट'
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तीव्रतेने वाढ होत आहे. यात मेरठमध्ये २४, आगरा २८ तर, लखनौ येथे ४ भाजी विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली असून भाजी विक्रेते हे उत्तर प्रदेशमधील कोरोना संसर्गाचे 'सॉफ्ट टार्गेट' म्हणून उदयास येऊ लागले आहे. गेल्या २४ तासात 'नवीन ठोक भाजीबाजारा'तील २४ भाजी विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हे मार्केट कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट बनले आहे.
16:00 May 05
स्थलांतरित आपापल्या राज्यात परतण्यास सुरुवात, दररोज 40 विशेष रेल्वेंची व्यवस्था
हैदराबाद (तेलंगणा) - लॉकडाऊननंतर हैदराबादमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांना पुन्हा त्यांच्या राज्यात बस आणि रेल्वेने पाठवण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. आज सकाळी स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणारी विशेष रेल्वे हैदराबादच्या घटकेसर रेल्वे स्टेशन मधून बिहार मधील खगारिया येथे जाण्यास रवाना झाली. काल हैदराबाद मधील गोवळकोंडा येथून शंभर स्थलांतरितांना घेऊन दोन खासगी बसेस झारखंडला रवाना झाल्या.
14:00 May 05
पीएम केअर फंड : 'सीआयएसएफ'च्या जवानांनी केली १६ कोटींची मदत..
नवी दिल्ली - कोरोनाशी लढा देण्यासाठी 'सीआयएसएफ'च्या जवानांनी आपले एक दिवसाचे वेतन पीएम केअर फंडला दिले आहे. सीआयएसएफचे महासंचालक राजेश राजन यांनी एकूण १६ कोटी रुपयांचा धनादेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल प्रदान केला. यामधील एकूण रक्कम १६ कोटी, २३ लाख, ८२ हजार ३५७ इतकी होती.
13:53 May 05
राजस्थानमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर पश्चिम बंगालमध्ये पोहोचले..
कोलकाता - राजस्थानमधून आलेले १,१८८ स्थलांतरीत मजूर दानकुणी रेल्वे स्थानकावर एकत्र आले आहेत. त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना ६४ बस आणि ४२ लहान गाड्यांच्या माध्यमातून आपापल्या गावांमध्ये पोहचवण्यात येणार आहे.
13:51 May 05
उत्तराखंड: एम्स रुग्णालयातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
देहराडून - उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट(एम्स) येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. युरोलॉजी विभागात रुग्णसेवेचे काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६१ झाला आहे.
12:59 May 05
नीट आणि जेईई परिक्षांच्या तारखा जाहीर..
नवी दिल्ली - मेडिकल एन्ट्रान्स टेस्ट असलेली 'नीट', आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठीची जेईई-मेन्स या परिक्षांची तारीख जाहीर झाली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री पोखरियाल यांनी याबाबत घोषणा केली आहे.
नीट ही २६ जुलैला होणार आहे, तर जेईई-मेन्स परिक्षा ही १८ ते २३ जुलैच्या दरम्यान होणार आहे.
12:28 May 05
कायदा आणि न्याय मंत्रालयामध्ये आढळला कोरोना रुग्ण, शास्त्री भवनमधील कार्यालय सील..
नवी दिल्ली - केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर प्रकरणे विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १ मे ला त्यांचा अहवाल आला होता. तर, २३ एप्रिलला ते कार्यालयात उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कायदेशीर प्रकरणे विभागाचे शास्त्री भवन येथील कार्यालय सील करण्यात आले आहे.
12:22 May 05
आंध्रमध्ये आढळले ६७ नवे रुग्ण, एकूण संख्या पोहोचली १,७१७वर..
अमरावती - आंध्र प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७१७वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ३४ बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
12:20 May 05
ओडिशामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७० च्या घरात
भूवनेश्वर - ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७० वर पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी ओडिशामध्ये एकूण ३ हजार ३५३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ओडिशामध्ये आत्तापर्यंत एका दिवसात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीचा हा आकडा सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आत्तापर्यंत आरोग्य विभागातर्फे ४४ हजार ६६३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
12:18 May 05
गावी जाण्यासाठी घालमेल; रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या 1 हजार परप्रांतीयांना पोलिसांनी अडवले
हैदराबाद - जवळपास 1 हजार परप्रांतीय कामगार सोमवारी नामपल्ली आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाकडे गावी परतण्यासाठी निघाले होते. बहादूरपुरा पोलिसांच्या हे निदर्शनास आल्यानंतर या सर्वांना ताब्यात घेऊन एका कार्यक्रम हॉलमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून काही बस मागवून या सर्वांना हॉलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
12:18 May 05
आग्रा : एका दिवसात 32 नवीन कोरोना रुग्ण, एकूण आकडा 628 वर
आग्रा (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. सोमवारी सकाळी 16 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 596 वरून 612 पर्यंत पोहचला होता. तोच सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत आणखी 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा आकडा 628 वर पोहचला. तसेच 15 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
12:17 May 05
तेलंगाणा भाजप अध्यक्षांनी सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा; पोलिसांनीही केले दुर्लक्ष
रंगा रेड्डी (तेलंगाणा)- तेलंगाणाचे भाजप अध्यक्ष बांदी संजय कुमार यांनी आज सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. बांदी कुमार हे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्यातील कोहेडा गावातील एका फळबाजारात गेले होते. या फळ बाजाराला मुसळधार पावसामुळे नुकसान झाले होते. यावेळी फळ बाजाराचा आढावा घेताना सदर प्रकार घडला.
12:17 May 05
दारू मिळत नसल्याने सॅनिटायझरसोबत इतर द्रव्य एकत्र करून प्यायल्याने दोघांचा मृत्यू
गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - सॅनिटायझर, दाढी करण्याचे क्रीम आणि नेल पॉलिश रिमूव्हर एकत्र करून प्यायलाने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगत राम शर्मा आणि क्रिष्ण पाली अशी मृतांची नावे आहेत.
12:17 May 05
'डायरेक्ट मनी ट्रान्स्फर' फक्त गरीबांपुरत मर्यादित नसावं, ६० टक्के जनतेच्या हातात जास्त पैसा द्यावा'
नवी दिल्ली - नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर चर्चा केली. यावेळी बॅनर्जी यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितले.
12:16 May 05
नागपूरच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाद्वारे स्वस्त वैद्यकीय उपकरणं, साहित्याची निर्मिती, नितीन गडकरींची माहिती
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपुरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत (एमएसएमई) चांगल्या प्रतीची आणि परवडणारे पीपीई किट तयार करण्यात आले आहे. त्यांनी ट्विटरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली. चीनवरून आलेले किट हे निकृष्ट दर्जाचे होते, आणि म्हणूनच चांगल्या गुणवत्तेच्या आणि स्वस्त अशा किट्सची निर्मीती करण्याची गरज समोर भासली, असे ते म्हणाले.
12:16 May 05
विविध राज्यात अडकलेल्या मजुरांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी मेधा पाटकर यांचे आंदोलन
बडवाणी (मध्य प्रदेश) - कोरोना विषाणुमुळे देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात आंदोलन केले.
12:16 May 05
मध्यप्रदेश : पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या ४०० मजुरांवर गुन्हा दाखल
बडवानी (भोपाल, मध्यप्रदेश) - मध्यप्रदेश पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या सुमारे 400 मजुरांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुमारे सात हजार मजुरांचा जमाव महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर जमा झाला होता. हे मजूर रोजंदारीसाठी महाराष्ट्रात आले होते. ते आपापल्या घरी जाऊ इच्छित होते. पण, त्यांना सीमेवर थांबिण्यात आल्याने त्यांनी पोलीस व उपजिल्हाधिकारी यांच्यावर दगडफेक केल होती. या उपजिल्हाधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
12:16 May 05
मेरठमध्ये कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू, पत्नीसह मुलालाही कोरोनाची लागण
मेरठ - बिजनौरमधील कोरोनाबाधित डॉक्टरचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. यानंतर मेरठमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली. मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या पत्नी आणि मुलाचा अहवालदेखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरला 27 एप्रिलला मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले होते.
09:37 May 05
कर्नाटकमध्ये एकाच दिवसात विकली गेली ४५ कोटींची दारू..
बंगळुरू - कालपासून देशातील ग्रीन आणि ऑरेंज जिल्ह्यांमध्ये दारुची दुकाने सुरू झाली आहेत. कर्नाटकात राज्यात काल पहिल्याच दिवशी ४५ कोटींची दारू विकली गेली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. ४० दिवसानंतर दारूची दुकाने उघडल्यामुळे त्यामुळे नागरिकांनी देशभरात दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या.
09:31 May 05
दिल्लीमध्ये दारू महागली; सरकारने लागू केला ७० टक्के अतिरिक्त कर..
नवी दिल्ली - दिल्ली सरकाने दारूवर अतिरिक्त कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्पेशल कोरोना फी' म्हणून हा कर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मद्यपींना दारू खरेदी करण्यासाठी एमआरपीच्या ७० टक्के अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे.
09:07 May 05
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४६ हजारांवर, आतापर्यंत पंधराशे बळी..
-
Total number of #COVID19 positive cases in India rises to 46433 including 32134 active cases, 12727 cured/discharged/migrated and 1568 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/WIoA2zzArC
— ANI (@ANI) May 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Total number of #COVID19 positive cases in India rises to 46433 including 32134 active cases, 12727 cured/discharged/migrated and 1568 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/WIoA2zzArC
— ANI (@ANI) May 5, 2020Total number of #COVID19 positive cases in India rises to 46433 including 32134 active cases, 12727 cured/discharged/migrated and 1568 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/WIoA2zzArC
— ANI (@ANI) May 5, 2020
नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या जाहीर केली आहे. नव्या आकडेवारीनुसार मंगळवारपर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४६,४३३वर पोहोचली आहे. यामधील ३२,१३४ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर, देशातील १२,७२७ रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. तसेच, देशात आतापर्यंत कोरोनामुळे १,५६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.