कोलकाता - भारताची राष्ट्रीय महिला बॉक्सिंगपटू सुमन कुमारीने कोलकाता पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. सुमन कुमारी म्हणाली, माझ्यासोबत गैरवर्तन झाले आहे. माझ्यासोबत छेडछाड केली जात होती. यादरम्यान, मला काहीही ठिक वाटत नव्हते.
सुमन म्हणाली, मोमिनपूर येथे मी स्कुटीवरुन जात होते. यादरम्यान, काही अज्ञातांनी माझा पाठलाग केला आणि नारेबाजी केली. मी त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली. यासोबतच त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करताना हाणामारीही केली. घटनेच्यावेळी कोलकाता पोलीस दलात कार्यरत असणारा एक व्यक्ती तिथे उपस्थित होता. परंतु, तक्रार केल्यानंतरही त्याने कोणतीही कारवाई केली नाही.
सुमन कुमारी भारताची राष्ट्रीय बॉक्सिंगपटू आहे. ती राज्य सरकारच्या कृषी विभागात काम करते. पोलिसांनी सुमन कुमारीच्या प्रकरणात आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही.