ETV Bharat / bharat

नारायण मूर्ती, चेतन भगत, गुगल सीईओ सुंदर पिचाई मुंबई आयआयटीत शिकले - विकासमंत्री पोखरियाल - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

अणू आणि रेणूंचा शोध चरक ऋषींनी लावला होता,असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक केला आहे.

'चालता बोलता संगणक संस्कृत भाषेमुळे शक्य' भाजप मंत्र्यानी तोडले अकलेचे तारे
author img

By

Published : Aug 11, 2019, 2:19 PM IST

मुंबई - अणू आणि रेणूंचा शोध चरक ऋषींनी लावला होता,असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक केला आहे. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ५७ वा दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.

  • Union Human Resource Development Minister, Ramesh Pokhriyal 'Nishank': Who did research on atoms & molecules? The one who researched on atoms and molecules, discovered them, was Charak Rishi. (10.8.19) https://t.co/d0yMBLnVwz

    — ANI (@ANI) August 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भविष्यात चालता बोलता संगणक केवळ संस्कृतमुळे शक्य होईल. संस्कृत ही एक वैज्ञानिक भाषा असून ज्यामध्ये शब्द जसा बोलला जातो तसाच लिहिला जातो हे नासाने सांगितले आहे. तर अणू-परमाणूचा शोध चरक ऋषींनी लावला होता. तर याचबरोबर नारायण मूर्ती, चेतन भगत आणि गुगल सीईओ सुंदर पिचाई हे या आयआयटी मुंबईतून शिकल्याची चुकीची माहितीही त्यांनी दिली.

भविष्यात जगात कुठेही रुग्णालय सुरू करायचं असल्यास आयुष आणि आयुर्वेदाला प्रथम प्राधान्य असेल. रुग्णचिकित्सा या दोन शास्त्रांच्या आधारे होईल,' असेही ते म्हणाले.
मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ५७ वा दीक्षान्त सोहळा शनिवारी आयआयटी मुंबईच्या दीक्षान्त सभागृहात पार पडला. आयआयटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला श्रीवत्सन श्रीधर याला शनिवारी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात २६०३ पदवी, ३८५ पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.