ETV Bharat / bharat

ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले वणव्याचा इशारा देणारे यंत्र; 'नासा'ने केले कौतुक! - नासा आय-टेक सायकल

ओडिशामधील दोन विद्यार्थ्यांनी असे उपकरण विकसीत केले आहे, ज्याद्वारे जंगलामध्ये लागलेल्या आगीची क्षणार्धात माहिती मिळू शकते. या उपकरणाचे 'नासा'ने कौतुक केले आहे, तर वन विभागाने या दोघांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे. 'ज्युएल बेटेल' (JUEL BETEL) असे नाव असलेले हे उपकरण नासाच्या यावर्षीच्या 'आय-टेक सायकल' या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.

NASA praised Odisha's duo for forest fire detection device
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:47 PM IST

भुवनेश्वर : वनप्रदेश नष्ट होणे ही पृथ्वीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. बेकायदा आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीबरोबरच, वणवा किंवा जंगलातील आग हेदेखील वनप्रदेश नष्ट होण्याचे मोठे कारण ठरत आहेत. नुकत्याच अमेझॉनच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वनप्रदेश नष्ट झाला होता.

ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले वणव्याचा इशारा देणारे यंत्र; 'नासा'ने केले कौतुक!

हेच लक्षात घेऊन ओडिशामधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यासंदर्भात उपाय करण्याचे ठरवले. याच प्रयत्नात, त्यांनी असे उपकरण विकसीत केले आहे, ज्याद्वारे जंगलात लागलेल्या आगीची माहिती क्षणार्धात वनविभागाला मिळू शकते. 'ज्युएल बेटेल' (JUEL BETEL) असे या उपकरणाचे नाव त्यांनी ठेवले आहे. या उपकरणाचे 'नासा'ने कौतुक केले आहे, तर वन विभागाने या दोघांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या प्रत्युष आणि प्रमित या दोन विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचे वैशिष्ट म्हणजे, दर वीस मिनिटांनी हे उपकरण जंगलातील परिस्थितीची माहिती वनविभागाला पाठवत राहते. या दोघांनी २०१८च्या ऑक्टोबरमध्ये याच्या संशोधनावर काम सुरु केले होते, तर २०१९च्या जून महिन्यात हे उपकरण तयार झाले.

नासा अंतराळ संशोधन संचलनालयामार्फत दरवर्षी 'आय-टेक सायकल' स्पर्धा घेण्यात येते, ज्यामध्ये जगभरातून नवनवीन उपकरणे सादर केली जातात. यावर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये २५ उपकरणे पोहोचली होती, ज्यामध्ये 'ज्युएल बेटेल'चा समावेश होता. विशेष म्हणजे, संपूर्ण आशिया खंडातून हे एकमेव उपकरण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.

हेही वाचा : बजाजच्या चेतक ई-स्कूटरचे लाँचिंग; ५ तासांच्या चार्जिंगवर ९५ किमीचे कापते अंतर

Intro:Body:

Bhubaneswar:Deforestration is now a days are the major concern for the Govt.Along with the illegal tree cutting the forest fire is the main cause of the deforestration .Huge chunk of forest cover is being destroyed due to this forest fire ...keeping this in mind  Two students from College of Engineering & Technology invented  a forest fire detection device  named ‘JUEL BETEL’ . NASA praised the state duo's talent and forest dept. also invited them  for a presentation.

The ultimate device designed by the Instumentation and electronics dept. final year students named pratyush and pramit. Best part is  that the device will send the data to forest dept in every 20 mins. pratyush and pramit  had started the project on october 2018 and finished it by june 2019.

The device ‘JUEL BETEL’  figured among the 25 semifinalists in this year’s NASA iTech Cycle, an initiative of NASA Space Technology Directorate, and was the alone entry from Asia in the list..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.