नवी दिल्ली - पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा 26 एप्रिलला 64 वा भाग प्रसारित होणार आहे. यामध्ये ते देशाला कोरोना महामारीबाबत संबोधित करणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया रेडिओनं अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत दिली आहे.
-
Prime Minister Shri @narendramodi will share his #MannKiBaat with the people of India & abroad on 26th April 2020 on all channels of @AkashvaniAIR.
— ALL INDIA RADIO (@AkashvaniAIR) April 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Share your ideas & suggestions by dialing the toll-free number 1800-11-7800 or by posting on the @mygovindia open forum.#PMonAIR pic.twitter.com/kF7QIg0Atp
">Prime Minister Shri @narendramodi will share his #MannKiBaat with the people of India & abroad on 26th April 2020 on all channels of @AkashvaniAIR.
— ALL INDIA RADIO (@AkashvaniAIR) April 15, 2020
Share your ideas & suggestions by dialing the toll-free number 1800-11-7800 or by posting on the @mygovindia open forum.#PMonAIR pic.twitter.com/kF7QIg0AtpPrime Minister Shri @narendramodi will share his #MannKiBaat with the people of India & abroad on 26th April 2020 on all channels of @AkashvaniAIR.
— ALL INDIA RADIO (@AkashvaniAIR) April 15, 2020
Share your ideas & suggestions by dialing the toll-free number 1800-11-7800 or by posting on the @mygovindia open forum.#PMonAIR pic.twitter.com/kF7QIg0Atp
देशावरील कोरोना संकट वाढतच चालले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकावरुन लोकांकडून सल्ले आणि काही कल्पनाही मागवल्या आहेत. यापूर्वी २९ मार्चला पंतप्रधानांनी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला होता. यावेळी देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्यांनी देशवासीयांची माफी मागितली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करतात.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 12 हजार 380 रुग्ण आढळले असून, यांपैकी 10 हजार 477 अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 414 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.