दिल्ली - नरेंद्र मोदी मंगळवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. सशक्त होणाची संधी भारताने सोडता कामा नये. 'जब हौसला बना उडान का, तब फिझूल है देखना कद आसमान का' असा शेर मारत विकासाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. देशाच्या अपेक्षांना पुर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळुन लढण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी भाजप सरकारने मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच कामे केल्यामुळेच जनतेने पुन्हा बहुमताने सत्तेत आणल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेती, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, दहशतवाद, गरिबी या विषयांवर सरकारची भुमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी हिंदु कोड बील, शहाबानो प्रकरणावरुन काँग्रेसवर टीका केली.
महामार्ग, स्टार्टअप, चंद्रयानामुळे देशाची वाटचाल आधुनिकीकरणाकडे झाल्याचे ते म्हणाले. आधी स्वातंत्र्यासाठी लढलो, आता देशाासाठी लढण्याची ताकद ठेवा, असे आवाहन मोदींनी केले. तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अनेक जणांनी मेक इन इंडिया, स्टार्टअप योजनेवर टीका केली, मात्र त्यामंळे तरुणांना रोजगार आणि कौशल्य मिळाल्याचे ते म्हणाले. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान असा नारा त्यांनी दिला.
आणीबाणीवरून काँग्रेसवर निशाणा साधत मोदींनी म्हणाले की, ४४ वर्षांपूर्वी २५ जून रोजी लोकशाही व माध्यमांना पायदळी तुडवण्यात आले होते. सत्तेसाठी काँग्रेस सरकारने देशाला बंदीशाळा बनवले होते. आणीबाणीचा हा डाग मिटणारा नाही. मात्र, आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. काँग्रेस एवढ्या उंचीवर गेला आहे की, खाली जमीन दिसत नाही, मात्र आम्ही जमिनीवर असून मुळापासुन बदल घडवण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील प्रकाश टाकला. शेतकऱ्यांना बीज आणि बाजार चांगले मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पाणी वाचविण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करणार असल्याचे ते म्हणाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- जनतेसाठी झटुन काम केल्यामुळेच आमचा ऐतिहासीक विजय.
- अनेक समस्या समोर आल्या तरी आम्ही जनतेचं हीत जोपासलं.
- निष्क्रीय सरकार पासून सक्रिय सरकार बदल घडवला.
- आधुनिक भारत बनवण्यासाठी लढायचयं.
- महामार्ग, स्टार्टअप, चंद्रयान यामुळे आधुनिकीकरणाकडे वाटचाल
- २००४ ते २०१४ मध्ये काँग्रेसने एकदाही अटलजी सरकारचे कौतुक केले नाही
- सत्तेसाठी काँग्रेस सरकारने देशाला बंदीशाळा बनवून टाकलं
- आधी स्वातंत्र्यासाठी लढलो, आता देशाासाठी लढण्याची ताकद ठेवा, मोदींचे आवाहन
- जब हौसला बना उडान का, तब फिझूल है देखना कद आसमान का
- बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय, मात्र काँग्रेसने त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेही केला नाही
- पाणी वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज
- पाणी संकट टाळण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती
- शेतकऱ्यांना बीज आणि बाजार चांगले मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत
- जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान
- सामान्य माणसाचं आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करत आहोत
- भ्रष्टाचार विरोधात आमची लढाई चालूच राहील, ज्यांना जामीन मिळालायं मौजमजा करावी
- हिंदु कोड बील आणि शहाबानो प्रकरणात काँग्रेस सरकारला मोठी संधी होती
- समान नागरी कायद्यावर निर्णय घेण्याची संधी काँग्रेसने गमावली