वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील ह्युस्टन येथे जोरदार आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत लाखो निवासी भारतीयांनी पंतप्रधानांना 'हाउडी मोदी' असे म्हणत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी, 'भारतात सर्व छान चाललं आहे', असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मी एकटा काहीही करू शकत नाही. मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा व्यक्ती आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. तसेच भारताचा खरा मित्र कोणी असेल, तर तो व्हाईट हाऊस मध्येच आहे, असे सांगून दोनही देशांमधील मैत्रीचे संबंध ठळक केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रम्प सरकार' चा नारा देऊन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे योगदान असून,त्यांनी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंधांसाठी प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले.
-
PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston. #HowdyModi pic.twitter.com/JyYY7P2LEa
— ANI (@ANI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston. #HowdyModi pic.twitter.com/JyYY7P2LEa
— ANI (@ANI) September 22, 2019PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston. #HowdyModi pic.twitter.com/JyYY7P2LEa
— ANI (@ANI) September 22, 2019
मला २०१७ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घडवली होती. मी आज त्यांना माझ्या कुटुंबाची भेट घडवत असल्याचे म्हणून मोदींनी उपस्थित भारतीयांकडे हात दाखवल्यानंतर नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तसेच ट्रम्प यांच्या कुटुंबाला भारत दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण यावेळी पंतप्रधानांनी दिले. ह्यूस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत,असे मोदींनी सांगितले.
-
#WATCH PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston, Texas. #HowdyModi pic.twitter.com/Uu6qLEeHVM
— ANI (@ANI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston, Texas. #HowdyModi pic.twitter.com/Uu6qLEeHVM
— ANI (@ANI) September 22, 2019#WATCH PM Narendra Modi and President Donald Trump take a lap around the NRG stadium in Houston, Texas. #HowdyModi pic.twitter.com/Uu6qLEeHVM
— ANI (@ANI) September 22, 2019
यावेळी मोदींनी कलम ३७० वर भाष्य केले. कलम ३७० ने जम्मू-काश्मीर व लडाखच्या लोकांना विकासापासून वंचित ठेवले होते. मात्र, आता भारतातील लोकांना जे अधिकार आहेत, तेच या लोकांना मिळत असल्याचे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीपासूनच ते लोकप्रिय होते. असे म्हणत मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक केले.
-
USA loves India: Trump after 'Howdy Modi!'
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/gRdi7jfVY5 pic.twitter.com/Sn8xYJFAAm
">USA loves India: Trump after 'Howdy Modi!'
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2019
Read @ANI story | https://t.co/gRdi7jfVY5 pic.twitter.com/Sn8xYJFAAmUSA loves India: Trump after 'Howdy Modi!'
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2019
Read @ANI story | https://t.co/gRdi7jfVY5 pic.twitter.com/Sn8xYJFAAm
तर, ट्रम्प यांनीही त्यांच्या भाषणात मोदी अत्यंत चांगले काम करत असल्याचे म्हटले. मोदी यांच्या नेतृत्वात भारत सशक्त होत असून, त्यांच्या कार्यकाळात ३० कोटी जनता गरीबी बाहेर आली आहे, असे ट्रम्प म्हणाले. तसेच दोनही देशांची घटना ‘वी द पीपल्स’ ने सुरू होत असल्याचा उल्लेख राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. पुढे बोलताना, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्र एकमेकांसोबत कार्यरत आहेत. इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच सीमा सुरक्षिततेच्या बाबत दोनही राष्ट्रे सक्षम असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.